तीव्र रक्तक्षयाच्या प्रमाणामध्ये घट

तीव्र रक्तक्षयाच्या प्रमाणामध्ये घट

भारताच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (Health Management Information System of India - HMIS) मधील डेटाच्या आधारे केलेल्या एका नवीन अभ्यासात मागच्या दशकात तीव्र रक्तक्षयाच्या (severe Anemia) प्रमाणात ७.८% घट दिसून आली आहे.

म्यानमारः लष्कराविरोधात हजारो नागरिकांची निदर्शने
भारताच्या ताब्यातले प्रदेश परत मिळवूः नेपाळचे पंतप्रधान
गुलजार अहमद पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी १३.५ पेक्षा कमी असेल आणि स्त्रियांमध्ये ती १२ पेक्षा कमी असेल तर ती रक्तक्षयाची स्थिती समजली जाते. हिमोग्लोबिन पातळी ७ पेक्षा कमी असेल तर तो ‘तीव्र रक्तक्षय’ समजला जातो. भारतामध्ये सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये रक्तक्षय स्थिती ही समस्या विशेष आव्हानात्मक आहे कारण तीव्र रक्तक्षय असलेल्या जगभरातील लोकसंख्येपैकी २५% तर दक्षिण आशियामधील लोकसंख्येपैकी ७५% लोक भारतात आहेत.

रक्तक्षयाचे निर्मूलन हे अजूनही एक आव्हानच असले, तरी भारताच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीमधील (एचएमआयएस) डेटाच्या आधारे केलेल्या एका नवीन अभ्यासात मागच्या दशकात तीव्र रक्तक्षयाच्या प्रमाणात ७.८% घट दिसून आली आहे. अभ्यासानुसार मागच्या दशकात देशातील तीव्र रक्तक्षयाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट दिसून आली आहे – २००८-२००९ मध्ये हे प्रमाण ११.३% होते तर २०१७-२०१८ मध्ये ते ३.२९% इतके कमी झाले आहे. अर्थात वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे प्रमाण बरेच वेगवेगळे आहे. केरळ, नागालँड, हिमाचल प्रदेश आणि गोवा येथे ते अगदी कमी (२% पेक्षा कमी) आहे. बिहारमध्ये दहा वर्षात ते १०.६ पासून ३.१% इतके कमी झाले आहे. हरियाणामध्येही ही संख्या १२.३% पासून ४.९% इतकी कमी झाली आहे.

मात्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या राज्यांमध्ये तीव्र रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आहे. या पोषण-संबंधित आजाराच्या प्रचलनामागे गरिबी हा एक घटक असला तरी त्याच्या प्राथमिक कारणांमध्ये हवामान, जनुकीय संरचना असे बाकीही अनेक घटक समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ, तेलंगणामध्ये वयस्कर शहरी लोकांमध्ये बी-१२ जीवनसत्त्वाची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसते त्यामुळे त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे हुकवर्म आणि व्हिपवर्म या परजीवींचा प्रादुर्भाव हे आंध्र प्रदेशमध्ये तीव्र रक्तक्षयाच्या रुग्णांची संख्या वाढण्यामागील एक कारण आहे.

तीव्र रक्तक्षयाचे प्रमाण

तीव्र रक्तक्षयाचे प्रमाण

“हा अभ्यास महत्त्वाचा आहे कारण त्यातून देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये तीव्र रक्तक्षयाची स्थिती काय आहे त्याचे एक सर्वांगिण चित्र आपल्याला पाहायला मिळते. तसेच मागच्या दहा वर्षामध्ये आपली कामगिरी कशी होती हेही समजून घ्यायला मदत मिळते,” आयसीएमआरच्या दिलबर्ग, आसाम येथील रीजनल मेडिकल सेंटरमधील एक शास्त्रज्ञ, डॉ. कौस्तुभ बोरा यांनी इंडिया सायन्स वायर शी बोलताना सांगितले.

‘सिकल सेल ऍनिमिया’ आणि ‘बीटा-थॅलेसमिया सिंड्रोम’ हे भारतातील इतर प्रदेशांपेक्षा उत्तरपूर्व भारतात कमी प्रचलित आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या बाबतीत त्याचा लाभ होतो. एखाद्या राज्यात मलेरिया पसरायला अनुकूल वातावरण असेल तर त्यामुळे लोकांमध्ये हिमोग्लोबिन पातळ्या कमी असण्याचीही शक्यता जास्त असते व त्यामुळे त्या राज्यातील लोकसंख्येमध्ये रक्तक्षयाच्या रुग्णांची संख्या अधिक असते.

“या अभ्यासामध्ये रक्तक्षयासारख्या सर्वसामान्य आजारांबाबत विचार केला असल्यामुळे तो महत्त्वाचा अभ्यास आहे. मात्र डेटाची गुणवत्ता तो कुठून घेतला त्या स्रोतावर अवलंबून असते, त्यामुळे कदाचित या डेटामध्ये सुधारणा होण्यासाठी बराच अवसर लागू शकतो.” असे एनआरसी मेडिकल कॉलेज, कोलकाता येथील प्राध्यापक डॉ. प्राणातर चक्रवर्ती म्हणाले. (डॉ. चक्रवर्ती हे या अभ्यासाशी संबंधित नाहीत.)

या अभ्यासाचे निष्कर्ष Tropical Medicine & International Health या जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले होते.

अदिती जैन, इंडिया सायन्स वायर येथे लिहितात.

मूळ लेख येथे वाचावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1