मतदारांना लाच; खासदाराला ६ महिन्याची शिक्षा

मतदारांना लाच; खासदाराला ६ महिन्याची शिक्षा

हैदराबादः तेलंगण राष्ट्र समितीच्या महबुबाबादच्या खासदार कविता मालोथ यांना २०१९च्या लोकसभा निवडणूक प्रचारात मतदारांना लाच दिल्या प्रकरणात एका स्थानिक न

ममता बॅनर्जी नंदीग्राममधून लढणार
३४०० वर्षांपूर्वीचा राजवाडा प्रकट झाला
शशी थरूर, राजदीप यांची सुप्रीम कोर्टात याचिका

हैदराबादः तेलंगण राष्ट्र समितीच्या महबुबाबादच्या खासदार कविता मालोथ यांना २०१९च्या लोकसभा निवडणूक प्रचारात मतदारांना लाच दिल्या प्रकरणात एका स्थानिक न्यायालयाने ६ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषी खासदारांना १० हजार रु.चा दंडही सुनावला आहे.

देशात पहिल्यांदाच लोकसभेच्या एखाद्या विद्यमान खासदाराला मतदारांना मतसाठी लाच देण्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कविता मालोथ यांचा २०१९च्या लोकसभा निवडणूक प्रचार भद्राद्री-कोथागुंडम जिल्ह्यात सुरू होता. त्यांच्या प्रचारात एक पक्षकार्यकर्ता शौकत अली मतदारांना मतांसाठी ५०० रुपये वाटत असताना निवडणूक आयोगाच्या पथकाला रंगेहाथ सापडला. या संबंधित निवडणूक आयोगाने बुर्गमपाहाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. या प्रकरणाच्या चौकशीत शौकत अली याने आपण कविता मलोथ यांना मते मिळावीत म्हणून त्यांच्या मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप करत होतो, अशी कबुली दिली. या कबुलीवर व पुराव्यांवरून न्यायालयाने कविता मालोथ यांना ६ महिन्याचा तुरुंगवास सुनावला आहे. निवडणूक आयोगाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत शौकत अली याला प्रथम क्रमांकाचा आरोपी व कविता मालोथ यांना दुसर्या क्रमाकांचा आरोपी असे नमूद केले होते.

दरम्यान या दोघा दोषींना न्यायालयाने जामीन दिला असून कविता मालोथ यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: