ममता बॅनर्जी नंदीग्राममधून लढणार

ममता बॅनर्जी नंदीग्राममधून लढणार

नंदीग्रामः तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथून विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय सोमवारी घेतला.

शाहीनबागचं आंदोलन काय सांगतंय?
‘पीएफआयवरील बंदीचे स्वागत; पण आरएसएसवरही बंदी घाला
बस गैरव्यवहारात गडकरी कुटुंबिय : स्वीडिश मीडियाचे वृत्त

नंदीग्रामः तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथून विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. मूळचे तृणमूलचे व आता भाजपात गेलेले सुवेंदू अधिकारी यांच्याशी त्यांचा थेट सामना होणार आहे. २०१६च्या विधानसभा निवडणुकांत नंदीग्राममधील भूकायदा चळवळीमुळे सुवेंदू अधिकारी येथे निवडून आले होते व त्याचा फायदा ममता बॅनर्जी यांनाही झाला होता. पण२०११मध्ये नंदीग्राममधील प्रकल्पाविरोधात राज्यात रान उठवल्याने ममता बॅनर्जी यांनी ३४ वर्षे सुरू असलेली डाव्यांची सत्ता संपवली होती.

सोमवारी ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये एक सभा घेतली. या सभेत त्यांनी तृणमूल पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचे आपल्या पक्षाला आव्हान नसल्याचा दावा केला. जे भाजपमध्ये गेले त्यांनी जनतेला लुटले. आपला पैसा सुरक्षित करण्यासाठी हे नेते भाजपच्या वळचणीला लागत असल्याचा आरोप त्यांनी अधिकारी यांचे उदाहरण देऊन केला.

आपल्या भाषणात ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रचाराची मोहीम नेहमी नंदीग्राममधून होते असे सांगत हा मतदार संघ आपल्यासाठी भाग्यवान असून येथूनच निवडणूक लढावी असे आपल्याला वाटत आहे, त्यासाठी पक्षाध्यक्ष सुब्रता बक्षी यांनी माझे नाव संमत करावे अशी विनंती त्यांनी केली. त्यावर बक्षी हे तत्परेतेने मंचावर गेले व त्यांनी ममता दिदींची विनंती मान्य केली.

ममता दिदी सध्या द. कोलकाता येथील भवानीपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्या भवानीपूर व नंदीग्राम अशा दोन ठिकाणाहून निवडणुका लढवण्याची शक्यता आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0