उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी निवड

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी निवड

भारतीय संविधान प्रमाण मानून महाराष्ट्र विकास आघाडी आज औपचारिकपणे स्थापन करण्यात आली आणि आघाडीच्या नेतृत्त्वापदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आणि पर्यायाने मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली. १ डिसेंबरला शिवतीर्थावर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.

शेतकरी संघटना-सरकारची ४ जानेवारीला पुन्हा बैठक
काँग्रेसचे अध्यक्षपद तूर्त सोनियांकडेच
अर्णबवरील फिर्याद रद्द करण्यास नकार

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, प्रहार संघटना, स्वाभिमानी पक्ष, कपिल पाटील यांनी एकत्रितपणे आज महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. आघाडीचे नेतृत्त्व करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली.

उद्धव ठाकरे यांची निवड करण्याची सुचना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी केली. त्याला काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले.

शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, मोठे छोटे उद्योग, दुर्लक्षित घटक यांच्यासाठी काम करण्यासाठी समन्वय समिती स्थापून काम करण्याचे उद्दिष्ट आघाडीने जाहीर केले.

हॉटेल ट्रायडंट येथे सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये आघाडीची स्थापना करण्यात आली.

उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या आपल्या व्यक्तिगत संबंधांना शरद पवार यांनी उजाळा दिला.

शरद पवार म्हणाले, की राज्य सुस्थितीत असावे, अशी राज्यातील लोकांची इच्छा आहे. ती जबाबदारी पेलण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली. महाराष्ट्र देशातील क्रमांक एकचे राज्य व्हावे, हे महाराष्ट्राचे हित ते जपतील.”

पवार म्हणाले, की देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी देशाकडे देश म्हणून पाहतील आणि देशाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राला मदत करतील.

१ डिसेंबरला शिवतीर्थावर नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले.

उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांना धन्यवाद दिले. ते म्हणाले ज्यांच्याबरोबर तीस वर्षे विश्वास ठेवला त्यांनी दगा दिला, पण ज्यांच्याशी तीस वर्षे संघर्ष केला त्यांनी विश्वास ठेवला. ते म्हणाले, “मला काहीतरी व्हायचे आहे, याचा मी कधीच विचार केला नव्हता. पण लोकांसाठी काम कारचा कुटुंबाचा वारसा आहे. सर्वासामान्य जनतेला वाटले पाहिजे, की हे आपले सरकार आहे, यासाठी काम करू.”

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची जी दैना झाली, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी काम करू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आमचे सरकार कोणाशीही सुडाने वागणार नाही, पण आडवे येऊ नका, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सहारद पवार याना विनंती केली, की अजित पवार याना सन्मानाने पुन्हा आघाडीत घ्यावे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0