९ जुलैला (उद्या) राज्यात रिक्षांचा संप

९ जुलैला (उद्या) राज्यात रिक्षांचा संप

ओला, उबर या टॅक्सी कंपन्यांची सेवा बंद करावी, अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी, त्वरित रिक्षा भाडेवाढ करावी या मागण्यांसाठी मंगळवारी ९ जुलैला राज्यातले र

नको असलेले लोक !
धनुष्यबाण शिवसेनेचेच चिन्ह राहणारः उद्धव ठाकरे
कोरोना संकटात अमित शहांच्या राजकीय आरोळ्या

ओला, उबर या टॅक्सी कंपन्यांची सेवा बंद करावी, अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी, त्वरित रिक्षा भाडेवाढ करावी या मागण्यांसाठी मंगळवारी ९ जुलैला राज्यातले रिक्षाचालक एक दिवसाचा संप करणार आहेत. या संपात मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांचा समावेश असून या दिवशी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.

गेले कित्येक दिवस रिक्षा मालक-चालक संघटनांची राज्याच्या परिवहन विभागासोबत बैठका होत आहेत. पण या बैठकांमध्ये संघटनांच्या मागण्यांबाबत कोणताही तोडगा होत नसल्याने अखेर संपाचे हत्यार उपसण्याचा रिक्षाचालकांनी इशारा दिला आहे.

रिक्षा मालक-चालक संघटनांच्या मागण्या

} ओला उबर या खासगी वाहतूक कंपन्यांची सेवा बंद करावी

} विमा कंपनीत भरण्यात येणारे पैसे कल्याणकारी महामंडळात जमा करावेत

}रिक्षा मालक-चालकांसाठी असलेले कल्याणकारी महामंडळ परिवहन खात्यांतर्गत असावे.

}चार ते सहा रुपये भाडेवाढ करावी.

}बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करावी

} चालक-मालकांना पेन्शन, ग्रॅज्युईटी, भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय मदत दिली जावी.

}जुन्या हकीम समितीच्या शिफारशी लागू कराव्यात.

(छायाचित्र – एएनआय ट्वीटर)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0