नवी दिल्लीः जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिद याची सुटका करा, अशी विनंती करणारे एक पत्रक जगभरातील २०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ, कलावंत, चित्रपट निर्माते,
नवी दिल्लीः जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिद याची सुटका करा, अशी विनंती करणारे एक पत्रक जगभरातील २०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ, कलावंत, चित्रपट निर्माते, लेखकांनी प्रसिद्ध केले आहे. या पत्रकावर नोम चॉम्स्की, अमिताव घोष, सलमान रश्दी, मीरा नायर या प्रख्यात विचारवंत, कलावंतांच्या स्वाक्षर्या आहेत. त्याचबरोबर पत्रकार पी. साईनाथ, रत्ना पाठक शहा, नकुल सहानी, अरुंधती रॉय, ज्युडीश बटलर, रोमिला थापर व शेल्डन पोलॉक यांनीही ही मागणी केली आहे.
सीएएविरोधात आंदोलन करणार्या उमर खालिद यांच्यावर खोटे पोलिसांनी आरोप दाखल केले असून त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार पायमल्ली केले जात आहेत. त्यांना भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार नाकारले जात आहेत. दिल्ली दंगलीचा तपास करणार्या पोलिसांनी निःपक्षपातीपणे चौकशी केली पाहिजे असेही या पत्रकात म्हटले आहे.
उमर खालिद यांनी काय गुन्हा केला आहे असा सवाल उपस्थित करत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जनआंदोलन करत असेल तर तो घटनेने दिलेला अधिकार आहे, तो अधिकार खालिद घटनेच्या चौकटीत मांडत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. दिल्ली पोलिस सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या पत्रकावर स्वाक्षरी करणार्या काही प्रमुख व्यक्तींची नावेः अँजेला डेव्हिस, राजमोहन गांधी, जी. जी. पारेख, मेधा पाटकर, अरुणा रॉय, सलमान रश्दी, रामचंद्र गुहा, मीरा कद्दस्वामी, इरफान हबीब, सुमीत सरकार, सुगाता बोस, जेम्स लेन, निवेदिता मेनन, सतीश देशपांडे, वेंडी ब्राउन इ. आहेत.
पूर्ण यादी
COMMENTS