आसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले

आसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले

गुवाहाटीः आसामच्या १२ वी बोर्डाच्या अभ्यासक्रमातून जवाहरलाल नेहरू, मंडल आयोग अहवाल, २००२च्या गुजरात दंगली, अयोध्या व जातींशी निगडित प्रकरणे वगळण्यात आ

नागालँडमध्ये १३ नागरिक सुरक्षा दलाकडून ठार
मेवानी यांचा जामीन मंजूर
ट्विट प्रकरणी जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांकडून अटक

गुवाहाटीः आसामच्या १२ वी बोर्डाच्या अभ्यासक्रमातून जवाहरलाल नेहरू, मंडल आयोग अहवाल, २००२च्या गुजरात दंगली, अयोध्या व जातींशी निगडित प्रकरणे वगळण्यात आली आहेत. कोरोनाच्या महासाथीमुळे या आधीच १२ वी बोर्डाचा ३० टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला होता. त्यानंतर ही नवी प्रकरणे वगळण्यात आली आहेत. आसामच्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे.

नवी प्रकरणे वगळण्याचा निर्णय राज्यातील शिक्षक संघटना, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली प्रकरणेः  पहिल्या तीन सार्वत्रिक निवडणुका, राष्ट्रनिर्मितीसंदर्भातील प. नेहरुंचा दृष्टिकोन, भूकबळी व पंचवार्षिक योजना, नेहरुंचे परराष्ट्र धोरण, नेहरुंनंतरचे त्यांचे उत्तराधिकार अशी प्रकरणे वगळण्यात आली.

याशिवाय गरीबी हटाओची घोषणा, गुजरात नवनिर्माण आंदोलन, पंजाबवरचे संकट व १९८४च्या शीख दंगली, मंडल आयोग अहवाल, युनायटेड फ्रंट व एनडीए सरकार, २००४च्या लोकसभा निवडणुका व यूपीए सरकार, अयोध्या वाद व २००२चे गुजरात दंगे ही प्रकरणे वगळण्यात आली आहेत.

काँग्रेस पक्ष व या पक्षाचा इतिहास, काश्मीर प्रश्न, चीन व पाकिस्तानविरोधात झालेली युद्धे, आणीबाणी, जनता पक्ष- भाजपचा उदय हे विषय कायम ठेवण्यात आले आहे.

इतिहासाच्या अभ्यासक्रमातून समता, जाती व वर्ग व्यवस्था ही प्रकरणे वगळण्यात आली आहेत.

त्याचबरोबर इंग्रजीतील मेमरीज ऑफ चाइल्डहूड हा धडा वगळला आहे. हा धडा अमेरिकेतल्या लेखिका व समाजसुधारक झित्कला सा व भारतातील दलित तामिळ लेखिका व शिक्षक बामा यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: