ऑगस्टमध्ये रोजगाराच्या संख्येत २४ लाखांनी घट

ऑगस्टमध्ये रोजगाराच्या संख्येत २४ लाखांनी घट

मुंबईः देशात ऑगस्ट महिन्यात बेरोजगारीची टक्केवारी ८.३ इतकी असल्याची माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने दिली आहे. ही टक्केवारी गेल्य

‘थप्पड’ : घुसमटीच्या संसाराला पर्याय असतो…
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आव्हान किती?
प्रियंका गांधी यांचा फोन हॅक – काँग्रेसचा आरोप

मुंबईः देशात ऑगस्ट महिन्यात बेरोजगारीची टक्केवारी ८.३ इतकी असल्याची माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने दिली आहे. ही टक्केवारी गेल्या वर्षभरातील सर्वोच्च असून जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रोजगार २४ लाखाने घसरून ३९ कोटी ४६ लाख इतका होता. जुलै महिन्यात हा आकडा ६.८ म्हणजे ३९ कोटी ७० लाख इतका होता.

सीएमआयईचे महाव्यवस्थापक महेश व्यास यांनी सांगितले की शहरातील बेरोजगारी ९.६ टक्के असून ग्रामीण बेरोजगारी ७.७ टक्के आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचे कारण शेतीतील अनियमित पेरण्या हे आहे. जुलै महिन्यात ग्रामीण भागातील बेरोजगारी ६.७ टक्के होती ती ऑगस्टमध्ये ७.७ टक्के झाली. याच काळात देशातील रोजगारीचा दर ३७.६ टक्क्यावरून घसरून ३७.३ टक्के इतका झाला आहे.

व्यास यांच्यानुसार ग्रामीण भागातील बेरोजगारी दरावर उशीरा आलेल्या मान्सूनचा परिणाम असून येत्या दोन महिन्यात शेती क्षेत्रातील घडामोडींमुळे तेथे रोजगार वाढल्याचेही दिसून येऊ शकते. पण शहरी बेरोजगारी संदर्भात कोणताही अंदाज व्यक्त करता येत नाही, असे व्यास म्हणाले.

सीएमआयईच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात हरयाणात सर्वात जास्त बेरोजगारी ३७.३ टक्के इतकी नोंदली गेली असून त्यानंतर जम्मू व काश्मीरमध्ये ३२.८, राजस्थानात ३१.४, झारखंडमध्ये १७.३ व त्रिपुरात १६.३ टक्के बेरोजगारीची नोंद झाली आहे.

छत्तीसगडमध्ये सर्वात कमी बेरोजगारी ०.४ टक्के इतकी असून मेघालयमध्ये २ टक्के, महाराष्ट्रात २.२, गुजरात व ओदिशात २.६ टक्के बेरोजगारीचा दर आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0