उन्नाव : भाजप आमदारावर हत्येचा गुन्हा दाखल

उन्नाव : भाजप आमदारावर हत्येचा गुन्हा दाखल

लखनौ : उन्नाव येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजपचे  आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्याविरोधात सोमवारी अखेर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि कटकारस्था

अशोक गेहलोत भाजपला खिंडीत पकडतील का?
नरसिंहानंदकडून ‘हर घर तिरंगा’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
बंडखोरांमुळे तृणमूलचे नुकसान किती?

लखनौ : उन्नाव येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजपचे  आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्याविरोधात सोमवारी अखेर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि कटकारस्थान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी या बलात्कार पीडित महिला रायबरेली येथे जात असताना तिच्या कारला ट्रकने धडक दिल्याने व त्यात महिलेची मावशी व काकू ठार झाल्यानंतर सर्वच थरातून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. विरोधी पक्षांनीही हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. अखेर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतला आणि तशा विनंतीचे पत्र केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहे.

रायबरेली नजीक रविवारी हा अपघात झाल्यानंतर खळबळ माजली होती. तेव्हाच या प्रकरणातले आरोपी कुलदीप सिंह सेंगर यांनी घातपाताचा कट रचल्याचा आरोप पीडिताच्या नातेवाईकांनी व राज्यातल्या विरोधी पक्षांनी करण्यास सुरूवात केली होती. सोमवारीही हे प्रकरण तापले होते.

कारला अपघात झाला तेव्हा महिलेच्या गाडीत पोलिस नसल्याचे लक्षात आल्याने या अपघाताबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनीही अंगरक्षक नसल्याचे मान्य केल्याने राज्य सरकारने लगेचच पोलिस चौकशीचे आदेश दिले.

पीडिताची काकू व मावशी ठार

रविवारी ही महिला आपली काकू, मावशी व वकिलासोबत रायबरेलीला जात असताना शहरापासून १५ किमी अंतरावर त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात मुलीची काकू व मावशी ठार झाले तर ही मुलगी व वकील गंभीर जखमी आहेत. या सर्वांना लखनौतील केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताप्रकरणात ट्रकचा मालक देवेंद्र सिंह व चालक अमित पाल यांना पोलिसांनी अटक केली असून घटनास्थळाचा पंचनामा लखनौच्या फॉरेन्सिक पथकाने केला आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरण

उत्तर प्रदेशात भाजपचे आदित्यनाथ सरकार आल्यानंतर काही दिवसांतच उन्नाव जिल्ह्यातल्या बांगरमऊ  विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला. सेंगर यांनी आपले घरातून अपहरण केले व बलात्कार केल्याचा आरोप ही तरुणी व तिची आई करत होती. पण पोलिसांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही.

अखेर या पीडितीने मुख्यमंत्र्यांच्या घरापुढे जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर या प्रकरणाची चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आणि सेंगर व त्यांच्या भावाला अटक करण्यात आली. नंतर पोलिसांनी पीडिताच्या वडिलांना शस्त्रास्त्र बंदी कायद्यांतर्गत अटक केली. पण तिचे वडील तुरुंगातच मरण पावले. त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या होत्या.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उन्नाव येथून भाजपचे साक्षी महाराज निवडून आले होते. त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय देण्यासाठी तुरुंगात जाऊन कुलदीप सिंह सेंगर यांचे आभार मानले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 2