उ. प्रदेशात निवडणुका ८० विरुद्ध २० होतील : आदित्य नाथ

उ. प्रदेशात निवडणुका ८० विरुद्ध २० होतील : आदित्य नाथ

लखनऊः उत्तर प्रदेशातील आगामी विधान सभा निवडणूक ८० विरुद्ध २० अशी होईल, असे विधान उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी केले. योगी यांच्या अशा

राम मंदिराच्या निधीसाठी उ. प्रदेश सरकारचे बँक खाते
कोरोनाशी लढू, पण या राजकीय व्हायरसचं काय?
अयोध्या: सरकार व न्यायसंस्थेला जमले नाही ते भारतातील मुस्लिमांनी करून दाखवले

लखनऊः उत्तर प्रदेशातील आगामी विधान सभा निवडणूक ८० विरुद्ध २० अशी होईल, असे विधान उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी केले. योगी यांच्या अशा या वादग्रस्त विधानामुळे उ. प्रदेशातील विधान सभा निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा ध्रुवीकरणावर खेळली जाईल असे स्पष्ट दिसते. उ. प्रदेशात ८० टक्के लोकसंख्या हिंदूंची असून उर्वरित २० टक्के लोकसंख्या मुस्लिम व अन्य अशी आहे.

आदित्य नाथ यांनी रविवारी लखनऊ येथील एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात वरील वक्तव्य केले. राज्यात ब्राह्मण मतांबाबत आदित्य नाथ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी निवडणुका अशा विचारांच्या पुढे गेल्या असून तो ८० विरुद्ध २० असा सामना असल्याचे उत्तर दिले.

या उत्तरानंतर ओवैसी यांनी आपण १९ टक्के आहोत, असे विधान केले होते, त्यावर आदित्य नाथ यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर आदित्य नाथ म्हणाले, ही लढाई आता ८० विरुद्ध २० अशी झाली असून जनता सुशासन व विकास यांच्यासोबत असतो. ८० टक्के लोक भाजपाच्या बाजूचे आहेत व उर्वरित शेतकरी विरोधी, विकास विरोधी, गुंड, माफियांची मदत करणारे आहेत. हे २० टक्के लोक विरोधी पक्षांचे असल्याचे आदित्य नाथ म्हणाले.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0