अमेरिकेच्या नौदलाची भारतीय हद्दीत घुसखोरी

अमेरिकेच्या नौदलाची भारतीय हद्दीत घुसखोरी

७ एप्रिलला लक्षद्वीप बेट समुहात भारताच्या सागरी हद्दीत कोणतीही पूर्वसूचना न देता अमेरिकेच्या नौदलाने युद्धसराव केल्याबद्दल भारताने नाराजी व्यक्त केली आहे. लक्षद्वीप बेट समुहात आपल्या नौदलाचे सामर्थ्य असल्याचा भारताचा जो दावा आहे, तो तपासण्यासाठी आम्ही आमच्या नौदलाच्या कवायती तेथे केल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या अमेरिकेने भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याचे मान्य केले आहे.

अमेरिकेची युद्धनौका यूएसएस जॉन पॉल जोन्स या नौदल कवायतीत सामील झाली होती. ही युद्धनौका अमेरिकेच्या सातव्या आरमाराचा एक भाग असून लक्षद्वीप बेट समूहापासून १३० सागरी मैलाच्या परिसरात- हा भाग भारताचा विशेष आर्थिक क्षेत्र समजले जाते- तेथे अमेरिकेच्या नौदलाने या कवायती केल्या. या युद्धनौकेवर क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत.

आपल्या कारवाईचे समर्थन करताना अमेरिकेच्या नौदलाने भारताचे दावे तपासण्यासाठी आम्ही अशी कारवाई केली, अशा शब्दांत केले.

दरम्यान अमेरिकेच्या या घुसखोरीवर भारताच्या परराष्ट्र खात्याने तीव्र शब्दांत नाराजी प्रकट केली आहे. अमेरिकेचे यूएसएस पॉल जोन्स युद्धनौका पर्शियनच्या आखातातून मल्लाका आखातात येईपर्यंत भारतीय नौदलाकडून त्यावर देखरेख ठेवली जात होती. पण भारताच्या सागरी हद्दीतून अमेरिकेची युद्धनौका जाण्याला आमची हरकत असल्याचे परराष्ट्र खात्याच्या पत्रात म्हटले आहे. परराष्ट्र खात्याच्या पत्रात भारताच्या नौदलाने अमेरिकेच्या युद्धनौकेला आव्हान दिले आहे का याबाबत स्पष्ट अशी माहिती नाही.

(लेखाचे छायाचित्र प्रतिनिधीक स्वरूपाचे )

मूळ बातमी

COMMENTS