कोरोनावर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन गुणकारी नाही  : रिपोर्ट

कोरोनावर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन गुणकारी नाही : रिपोर्ट

अमेरिकेत कोविड-१९ विषाणू बाधितांना सध्या देण्यात येणार्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाचे फारसे चांगले परिणाम दिसत नसून हे औषध दिल्याने कोरोनाबाधित र

कोरोनाचे औषध नव्हे, केवळ बनवाबनवी!
राज्यात ४३ दिवसांत ७६ हजार लहान मुलांना कोरोना
लॉकडाऊन २ आठवड्यांनी वाढवला, १३० जिल्हे रेड झोनमध्ये

अमेरिकेत कोविड-१९ विषाणू बाधितांना सध्या देण्यात येणार्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाचे फारसे चांगले परिणाम दिसत नसून हे औषध दिल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतसंख्येत वाढ दिसत असल्याचे ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’च्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. पण हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधाची शिफारस व त्याला विरोध याची अद्याप क्लिनिकल आकडेवारी हाती नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानंतर हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधाचे जोरदार समर्थन करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या अहवालावर गंभीर विचार केला जाईल, असे म्हटले आहे.

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे मलेरियावरील औषध असून अमेरिकेतील कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे औषध अमेरिकेने भारताकडून मागवले होते. सध्या अमेरिकेकडे भारताकडून आयात झालेल्या या औषधाचा तीन कोटीहून अधिक साठा आहे.

मंगळवारी ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या अहवालाबद्दल विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, मला या अहवालाबद्दल अद्याप माहिती नाही. पण जर या औषधाचे दुष्परिणाम दिसत असतील तर त्यावर गंभीर विचार करावा लागेल व त्यावर लवकरच सरकार भूमिका घेईल.

‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’च्या अहवालात म्हटले आहे की, कोरोना विषाणूविरोधात एझिथ्रोमायसीन सोबत किंवा त्याच्याशिवाय हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषध घेतल्यास कोरोना विषाणूंचे शरीरातील संक्रमण थांबते याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालातही हायड्रोक्सिक्लोरोक्विन हे कोविड-१९वर गुणकारी ठरेल यावर संशोधन सुरू आहे. या संशोधनात हे औषध गुणकारी ठरेल यावर अद्याप सहमती झालेली नाही.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या समितीने शरीरात निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्विन व एझिथ्रोमायसीन या गोळ्या एकत्र घेण्याची शिफारस केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0