पिगॅससः एनएसओकडून मोठी लाच देण्याचा प्रयत्न

पिगॅससः एनएसओकडून मोठी लाच देण्याचा प्रयत्न

नवी दिल्लीः पिगॅसस स्पायवेअर निर्माण करणाऱ्या एनएसओ ही इस्रायल कंपनी अमेरिकेतील एका मोबाइल सिक्युरिटी कंपनीला ग्लोबल मार्केट नेटवर्क मिळवण्यासाठी मोठ्

बिहारमध्ये एनडीए फुटली; नितीशविरोधात पासवान
छुटनी देवीः स्त्रीसन्मानाचा एक संघर्ष…!
वाढवण बंदर विरोधी बंदला १०० टक्के प्रतिसाद

नवी दिल्लीः पिगॅसस स्पायवेअर निर्माण करणाऱ्या एनएसओ ही इस्रायल कंपनी अमेरिकेतील एका मोबाइल सिक्युरिटी कंपनीला ग्लोबल मार्केट नेटवर्क मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम देणार होती, असा खळबळजनक आरोप एका जागल्याने केला आहे. या जागल्याने ही माहिती अमेरिकेच्या न्याय खात्याला दिली आहे. द वॉशिंग्टन पोस्ट व द गार्डियन या दोन वृत्तपत्रांनी मंगळवारी हे वृत्त दिले आहे. ही दोन वृत्तपत्रे पिगॅसस स्पायवेअरचा पदार्फाश करणाऱ्या माध्यम संस्थांमधील दोन प्रमुख संस्था आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये एनएसओ कंपनीला अमेरिकेच्या सरकारने आपल्या काळ्या यादीत टाकले आहे. त्यानंतर एनएसओ संदर्भातल्या अनेक वादग्रस्त बाजू उघडकीस येत आहे.

२०१७ साली ऑगस्ट महिन्यात मोबाइल सिक्युरिटी तज्ज्ञ गॅरी मिलर यांच्याशी एनएसओ कंपनीचे सहसंस्थापक शाल्वे हुलिओ व ओम्री लेव्ही यांनी वेब व्हॉइस कॉलद्वारे संपर्क साधला. या संभाषणात या प्रतिनिधींनी एनएसओ ही कंपनी ग्राहकांवर पाळत ठेवण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले होते. आमची कंपनी चांगल्या नव्हे पण वाईट लोकांवर पाळत ठेवत असल्याचे या दोघांनी सांगितले. या संभाषणात लेव्ही यांनी आम्हाला नेटवर्कमधून माहिती दिल्यास पैशाच्या थैल्या तुम्हाला ऑफिसमध्ये मिळतील असा प्रस्ताव मिलर यांच्यापुढे ठेवला होता. एनएसओ कंपनीला मोबिलियम या कंपनीकडून माहिती हवी होती. ही कंपनी कॅलिफोर्नियातील असून ती मोबाइल कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सिक्युरिटी सेवा देत असते.

एनएसओला मोबिलियम कंपनीच्या एसएस7 नेटवर्कमध्ये घुसखोरी करून जगभर फिरत असणाऱ्या ग्राहकांचे रूट कॉल व सेवेसंदर्भात माहिती हवी होती. या माहितीनुसार एखाद्या ग्राहकावर हेरगिरी करणे, त्याचे ठिकाण निश्चित करणे एनएसओला शक्य होणार होते.

सेल्युलर कंपन्या एसएस7 नेटवर्कमध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून काही बंधने आणत असतात तसेच एका फायरव़ॉलद्वारे एखाद्या ग्राहकाची वैयक्तिक माहिती मिळू नये याची खबरदारी घेत असतात. एनएसओला या सिक्युरिटी प्रणालीत शिरकाव करायचा होता.

दरम्यान एनएसओ कंपनीने मिलर यांच्या आरोपांचा इन्कार केला आहे. आम्ही मोबिलियम कंपनीशी कोणताही व्यवहार केला नाही. आमचा अशा कोणत्याही घटनांचा संबंध नाही तसेच अमेरिकेच्या न्याय खात्याकडून सुरू असलेल्या चौकशीची आम्हाला माहिती नाही, असे एनएसओने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची जागल्या झालेले मिलर हे पूर्वी मोबिलियम कंपनीत काम करत होते. नंतर ते जून २०२१मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमधील सिटीजन लॅबमध्ये रुजू झाले होते. ते मोबाइल सिक्युरिटी संशोधक म्हणून काम करतात.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0