‘गलवानमध्ये चीनचा झेंडा, मोदी गप्प का?’

‘गलवानमध्ये चीनचा झेंडा, मोदी गप्प का?’

नवी दिल्लीः १ जानेवारी २०२२ रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनने आपले झेंडा लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का असा थेट सवाल काँग्रेसचे नेते राहुल

चीनचा विरोध असतानाही नॅन्सी पॅलोसी यांचा तैवान दौरा यशस्वी
‘टाइम्स नाऊ’ने दाखवली ‘थ्री इडियट्स’मधील दृश्ये
आम्ही कोरोना विषाणू पसरवला नाही : चीनचे स्पष्टीकरण

नवी दिल्लीः १ जानेवारी २०२२ रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनने आपले झेंडा लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का असा थेट सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे. चीनच्या सैनिकांची घुसखोरी भारतीय हद्दीत झाल्याने मोदी त्यावर मौन बाळगून आहेत त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. आमचा तिरंगा गलवानमध्ये देखणा दिसत होता, मोदींनी चीनला प्रत्युत्तर दिले पाहिजे, त्यांनी आपले मौन सोडून कडक उत्तर द्यावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

१ जानेवारी रोजी चीनच्या शेन शिवेई या पत्रकाराने गलवानमध्ये चीनने त्यांचा झेंडा फडकवल्याचा एक व्हीडिओ ट्विटरवर प्रसिद्ध केल्याचे वृत्त यूएनआय या वृत्तसंस्थेने दिले होते. या व्हीडिओमध्ये नववर्षाच्या दिवशी गलवानमध्ये चीनचा ध्वज फडकवल्याची दृश्ये दिसत होती. चीनच्या सैनिकांनी असा ध्वज फडकवत आपल्या देशवासियांना शुभेच्छा दिल्याचे शेन शिवई यांचे ट्विट होते. हा भूभाग गलवानमध्येच आहे असा शेन शिवई याचा दावा असला तरी त्याचा थेट पुरावा दिसत नाही. शेन शिवई हे सोशल मीडियावर पक्षपातपूर्ण व भ्रामक प्रचार करणारे सरकारपुरस्कृत पत्रकार मानले जातात.

या अगोदर शिवेई यांनी भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्तमान यांची मस्करी केली होती. अभिनंदन यांच्यासोबत काही पाकिस्तानी सैनिक असल्याचा एक फोटो शिवेई यांनी सोशल मीडियात प्रसिद्ध केला होता.

पण १ जानेवारीला गलवानमध्ये चीनचा झेंडा फडकवल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मोदी सरकारवर टीका होऊ लागली. भारताने या व्हीडिओबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0