डॉ. कफील खान यांच्या चौकशीचे पुन्हा आदेश

डॉ. कफील खान यांच्या चौकशीचे पुन्हा आदेश

लखनऊ : ऑगस्ट २०१७ मध्ये गोरखपूरमधील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी ७० मुलांच्या मृत्यूप्रकरणात निलंबित करण्यात आलेले डॉ. कफील खान यांची पुन्हा

कफील खान यांच्या सुटकेचे सुप्रीम कोर्टाकडून समर्थन
‘डॉ. काफील खान यांची सुटका व्हावी की नाही’
डॉ. कफील खान यांची त्वरित सुटका करण्याचे आदेश

लखनऊ : ऑगस्ट २०१७ मध्ये गोरखपूरमधील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी ७० मुलांच्या मृत्यूप्रकरणात निलंबित करण्यात आलेले डॉ. कफील खान यांची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहे. कर्तव्यच्युती, भ्रष्टाचार व बेजबाबदारपणाने काम केल्याचे आरोप डॉ. कफील खान यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. डॉ. कफील खान यांना कोणतीही क्लीन चीट दिलेली नाही आणि विभागीय चौकशीत कोणताही निर्णय घेतलेला नाही. डॉ. कफील खान यांच्यावर ज्या मुद्द्यांवर आरोप ठेवण्यात आले होते त्याची चौकशी अजून सुरू असल्याने त्यांना क्लीन चीट देता येत नाही असा पवित्रा उ. प्रदेश सरकारने घेतला आहे.

गेल्याच आठवड्यात बीआरडी मेडिकल कॉलेज बालमृत्यू प्रकरणात हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा दाखवल्याच्या आरोपातून डॉ. कफील खान यांची विभागीय चौकशी समितीने निर्दोष म्हणून सर्व आरोपातून मुक्तता केली होती. पण गुरुवारी अचानक राज्याचे आरोग्य सचिवांना एक पत्रकार परिषद घेऊन डॉ. कफील खान यांची पुन्हा चौकशी केली जाईल असे जाहीर केले. डॉ. कफील खान यांच्यावर खासगी वैद्यकीय व्यवसाय करणे व स्वत:ची नर्सिंग होम चालवण्याचा आरोप असून ते चौकशीत दोषी आढळून आल्याचे चौकशी अधिकारी रजनीश दुबे यांनी सांगितले. डॉ. कफील हे निर्दोष असल्याचा दावा प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमातून जोरदार केला जात आहे पण हे दावे तथ्यहीन असल्याचेही दुबे म्हणाले.

१० ऑगस्ट २०१७मध्ये बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनच्या अभावी ७० मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उ. प्रदेशमधील आदित्य नाथ सरकारविरोधात देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. उ. प्रदेश सरकारमधील प्रशासकीय बेजबाबदारपणा व आरोग्य मंत्र्यांचे दुर्लक्ष यावर चोहोबाजूंनी टीका झाली होती. पण सरकारने या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कारवाई न करता व राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राजीनामा न देता डॉ. कफील खान यांच्यावर कर्तव्यच्युती, हलगर्जीपणा असे आरोप ठेवत त्यांना निलंबित केले होते व त्यांची रवानगी तुरुंगात केली होती. त्यावेळी डॉ. कफील खान यांनी आपल्याला या प्रकरणात मुद्दामून गोवण्यात आल्याचा आरोप केला होता. वास्तविक डॉ. कफील खान यांनी प्रसंगावधान दाखवत बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर आणून अनेक मुलांचे प्राण वाचवले होते. डॉ. कफील खान यांनी या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटी प्रसारमाध्यमांसमोर आणून दिल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित केले होते.

ऑगस्ट २०१७मध्ये जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री आदित्य नाथ यांनी बीआरडी मेडिकल कॉलेजमधील दुर्घटना ऑक्सिजनमुळे नव्हे तर संस्थेतील अंतर्गत गटबाजीमुळे घडल्याची प्रतिक्रिया दिली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0