डेहराडूनः हरिद्वार येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी उत्तराखंड पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) मदत मागितली आहे. एनडीटीव्हीने दिले
डेहराडूनः हरिद्वार येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी उत्तराखंड पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) मदत मागितली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार कुंभमेळा व्यवस्था पाहणारे पोलिस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तराखंड प्रांताचे संघ संचालक व प्रांत कार्यवाह यांना एक पत्र लिहून त्यात संघ प्रचारक व अन्य पदाधिकार्यांची मदत हवी आहे, अशी विनंती केली आहे.
गर्दीचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, कोरोनाचे आव्हान यासाठी संघ स्वयंसेवकांनी पोलिसांना मदत करावी, संघ स्वयंसेवकांनी भाविकांच्या व्यवस्थेकडे पाहावे अशी पोलिसांची विनंती आहे.
हरिद्वारमध्ये १ एप्रिलपासून कुंभमेळ्याला सुरूवात झाली असून कोरोनामुळे हा मेळा १ एप्रिल ते ३० एप्रिल एवढ्याच काळासाठी आयोजित करण्यात आला आहे. कोरोनामुळे या मेळ्याला सामील होणार्या भाविकांवरही विविध बंधने घालण्यात आली आहेत. हरिद्वार येथे पोहचण्याअगोदर ७२ तास आधी कोविड-१९ची आरटी-पीसीआर निगेटिव्ह चाचणीचा अहवाल वा कोरोना लस घेतल्याचा पुरावा भाविकांना बंधनकारक आहे.
मूळ बातमी
COMMENTS