वंचित बहुजन आघाडीतून एमआयएम बाहेर

वंचित बहुजन आघाडीतून एमआयएम बाहेर

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा राजकीय घटक ठरलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआय

१०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान
बायडेन विजयाच्या नजीक; सिक्रेट सर्व्हिसचे संरक्षण
काश्मीरमधील निवडणुकांवर स्थगितीसाठी राष्ट्रपतींना पत्र

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा राजकीय घटक ठरलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने शुक्रवारी घेतला. प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपात सन्मान राखला नाही त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी लागेल अशी एमआयएमचे नेते व खासदार इम्तियाज जलील यांनी घोषणा केली.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीत फूट पडल्याने या दोन्ही पक्षांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. एमआयएमने वंचित आघाडीकडे राज्यातल्या एकूण २८८ पैकी ७६ जागा मागितल्या होत्या. पण आंबेडकर त्यांना आठ जागांपेक्षा अधिक जागा देण्यास तयार नव्हते. त्यात औरंगाबाद मध्य मतदारसंघही देण्यास त्यांचा नकार होता. पुण्यातही एमआयएमला तीन जागा हव्या होत्या. अखेर जागावाटपाची चर्चा फिस्कटल्याने एमआयएमने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

एमआयएमने २०१४च्या विधानसभा निवडणुकांत २४ जागा लढवून दोन ठिकाणी विजय मिळवला होता आणि ९ जागांवर ते दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. राज्यात एमआयएमचे दीडशेपेक्षा अधिक नगरसेवक आहेत. एवढी आमची राजकीय ताकद असल्याचे प्रसिद्धपत्र एमआयएमने या फुटीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केले आहे.

दीड महिन्यांपूर्वी लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या हेकेखोर स्वभावाविरोधात व भाजप-संघपरिवाराला लोकसभा निवडणुकांत अप्रत्यक्ष साथ दिल्याची तक्रार करत वंचित आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरचा एमआयएमने बाहेर पडणे हा वंचित आघाडीला दुसरा धक्का आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0