नरसिंहानंदकडून ‘हर घर तिरंगा’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

नरसिंहानंदकडून ‘हर घर तिरंगा’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

गाझियाबादः  शहरातील डासना देवी मंदिराचे पीठाधीश्वर व कट्टरवादी हिंदू धर्मगुरू यति नरसिंहानंद यांनी सत्तारुढ भाजपच्या ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमावर सर्व

बिहारमध्ये जदयु – भाजपमध्ये लव्ह जिहाद !
२००२ मधील गुजरात दंगलींचा निवडणुकांशी संबंध?
अमित मालवीय बंगालचे सहप्रभारी

गाझियाबादः  शहरातील डासना देवी मंदिराचे पीठाधीश्वर व कट्टरवादी हिंदू धर्मगुरू यति नरसिंहानंद यांनी सत्तारुढ भाजपच्या ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमावर सर्व हिंदूंनी बहिष्कार घालावा असे आवाहन केले आहे. या संदर्भातील एक व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीस चित्रित करण्यात आला आहे. पण तो नंतर सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

या व्हीडिओत नरसिंहानंद यांनी भाजपच्या ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमावर प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहेत. सरकारने तिरंगा निर्मितीचे कंत्राट प. बंगालमधील सल्लाउद्दीन मंडल या मुस्लिम व्यावसायिकाला दिले आहे, त्यामुळे या मोहिमेवर सर्व हिंदूंनी बंदी घालावी असे नरसिंहानंद यांचे म्हणणे आहे.

हिंदू तिरंगा विकत घेणार आणि त्याचा पैसा मुसलमानांच्या खिशात जाणार, हा पैसा पुढे जिहादींना (दहशतवादी) दान करणार. हिंदू समाजाची पुढची पिढी आधीच मुस्लिम दहशतवाद्यांपासून स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे मुस्लिम व्यापाऱ्यांचा फायदा होऊ नये म्हणून हिंदूंनी भाजपच्या मोहिमेवर बहिष्कार घालावा अशीही वक्तव्ये नरसिंहानंद यांनी केली आहेत.

नवा तिरंगा विकत घेण्यापेक्षा जुना तिरंगा हिंदूंनी आपल्या घरावर फडकवावा पण सलाउद्दीनला पैसा देऊ नका. मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार घाला असे हिंदू नेते सांगतात पण सत्तेवर आल्यानंतर मुस्लिमांनाच सरकारी कंत्राटे देतात, अशा नेत्यांना धडा शिकवला पाहिजे. हिंदूंचा पैसा मुसलमानांना श्रीमंत करण्यासाठी खर्च करता कामा नये, नंतर त्यांची मुले मारण्याची योजना तयार करता येईल, पण अशा लोकांच्या जाळ्यात फसू नका, अशी अनेक धार्मिक तेढ वाढवणारी गंभीर विधाने नरसिंहानंद यांनी केली आहेत.

झेंड्याचे कंत्राट कोणाला?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने तिरंगा निर्मितीचे कंत्राट ९ जणांना दिले असून त्यातील एक कंपनी कोलकाता येथील सलाउद्दीन मंडल या मुस्लिम व्यावसायिकाची आहे. सांस्कृतिक खात्याने तिरंगा निर्मितीची ज्यांना कंत्राटे दिली आहेत, त्याची यादी प्रकाशित केली आहे. या यादीत मंडल यांची उद्दिन एंटरप्रायजेस, कोलकाता याचे नाव आहे.

सलाउद्दिन हे प. बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातल्या बरुईपूर गावातले व्यापारी असून त्यांच्याकडे झारखंड, उ. प्रदेश, ओदिशा, अरुणाचल प्रदेश व आसाम या राज्यांनी तिरंग्याचे कंत्राट दिले आहे. केंद्राने बंगालमध्ये अनेक शैक्षणिक संस्था व संघटनांनाही येथून तिरंगा खरेदी करण्यास सांगितले आहे.

मंडल यांच्याकडे ३ ते ४ कोटी झेंड्यांचे कंत्राट देण्यात आले आहे, त्यापैकी ६० लाख तिरंगा विक्रीस गेले आहेत. प्रत्येक झेंड्याची किमत १८ ते २४ रु.च्या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0