विजय रुपाणी यांचा राजीनामा

विजय रुपाणी यांचा राजीनामा

नरेंद्र मोदी यांचे विश्वासू मानले जाणारे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी दुपारी गुजरातचे

लॉकडाऊन व नॉकडाऊन दोन्हीही नकोः मुख्यमंत्री
तोक्ते चक्रीवादळ; पूर्ण खबरदारी घेतलीः मुख्यमंत्री
फोन टॅपिंग : सत्य बाहेर येण्याची शक्यता कमीच …..

नरेंद्र मोदी यांचे विश्वासू मानले जाणारे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी दुपारी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा दिला.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पुढच्या वर्षी होणार आहेत. एक वर्षे बाकी असताना, रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. ते म्हणाले, “आपल्याला कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे. पक्षातील जबाबदाऱ्या काळानुसार बदलत राहतात. पक्षात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, असे रुपाणी म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अचानक अहमदाबादला पोहोचले होते. त्यांच्या गुजरात भेटीबाबत कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा, महापौर किरीट परमार आणि स्थायी समिती अध्यक्ष हितेश बारोट विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचले होते. तेनंतर आज रुपाणी यांचा राजीनामा आला आहे.

“पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. यापुढे मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी पार पाडीन. आम्ही पद नाही जबाबदारी नाही म्हणतो. मला जी जबाबदारी देण्यात आली होती ती मी पार पाडली आहे. आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका लढतो आणि २०२२च्या निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील,” असे विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.

२६ डिसेंबर २०१७ रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखाली १८२ पैकी ९९ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून रुपाणी आणि उपनेते म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली होती.

विजय रूपाणी आणि गुजरात भाजपमध्ये अनेक दिवस मतभेद सुरू होते. गुजरात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सी.आर.पाटील यांच्याबरोबर त्यांचे मतभेद होते. विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखाली सरकारची पकड सैल होत असल्याचेही पक्षातील अनेकांचे म्हणणे होते. राज्यातील प्रतिमेबाबत रूपाणी सरकारची प्रतिमा कमकुवत होत होती. काही दिवसांपासून गुजरात सरकारचे नेतृत्त्व बदलण्याची चर्चा सुरु होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0