विराटचा गैरवापर केल्याचा मोदींचा दावा खोटा

विराटचा गैरवापर केल्याचा मोदींचा दावा खोटा

माजी नौसेना प्रमुख ऍडमिरल एल. रामदास (सेवानिवृत्त) यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा दावा नाकारला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही जहाजांना, विशेषतः गांधी कुटुंबाच्या, खाजगी वापरासाठी वापरण्यात आलेले नाही.

कॅमेरा फ्रेम, मोदी आणि दगाबाजी
रोख रकमेच्या अनुदानाची चलाख खेळी
फेसबुक आणि भाजपचे ‘घोस्ट’ जाहिरातदार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आरोपाप्रमाणे राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा खाजगी टॅक्सी म्हणून वापर केला होता, सदर आरोप माजी नौसेना प्रमुख ऍडमिरल रामदास तसेच सदर विमान वाहक नौकेचे माजी कमांडिंग ऑफिसर यांनी नाकारला आहे.

त्यावेळी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या भेटीच्या वेळी सेवानिवृत्त वाईस एडमिरल विनोद पसरीचा नौकेचे कमांडिंग ऑफिसर होते; गांधी यांच्या १९८७च्या अधिकृत दौऱ्यावर सर्व शिष्टाचार पाळले गेले होते, त्याचबरोबर कोणतेही विदेशी किंवा इतर पाहुणे यावेळी उपस्थित नव्हते, असे त्यांनी सांगितले आहे.

माजी प्रधानमंत्र्यांनी ‘आयएनएस विराट’चा खाजगी टॅक्सी प्रमाणे वापर केला आणि त्यांचे सासू सासरे सुध्दा जहाजावर होते, असे उद्गार मोदींनी निवडणूक प्रचारसभेत काढले.

माजी अॅडमिरल एल. रामदास यांनी प्रसिध्द केलेले निवेदन.

माजी अॅडमिरल एल. रामदास यांनी प्रसिध्द केलेले निवेदन.

“हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे,” उप ऍडमिरल पसरीचा यांनी म्हटले आहे.

पण दुसऱ्याबाजूला आणखी एक माजी नैसेना कमांडर (सेवानिवृत्त) वी. के. जेटली, यांनी ट्विट करताना म्हटले आहे, “राजीव आणि सोनिया गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर सुट्टी साजरी करण्यासाठी आणि बंगराम बेट येथे फिरण्यासाठी केला. भारतीय नौसेनेच्या स्रोतांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. मी याचा साक्षीदार आहे. त्यावेळी मी आयएनएस विराट या नौकेवर तैनात होतो.”

तर माजी नौसेना प्रमुख रामदास, जे दक्षिण नौसेनेचे कमांडर होते, यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले आहे की, “कोणत्याही विदेशी नागरिकांनी ‘आयएनएस विराट’ला भेट दिली नाही आणि तसेच राजीव गांधी व त्यांची पत्नी हे दोघे नौकेवर उपस्थित होते त्यावेळी सर्व प्रकारचे अधिकृत शिष्टाचार पाळले गेले होते.”

“प्रधानमंत्री आणि श्रीमती गांधी यांनी ‘आयएनएस विराट’मधून त्रिवेंद्रम येथून सुरुवात केली व लक्षद्वीप येथेही भेट दिली. प्रधानमंत्री, त्रिवेंद्रम येथे राष्ट्रीय खेळांच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.” असे माजी नौसेना प्रमुख म्हणाले. “ते लक्षद्वीप येथे आयडीए (इसलँड्स डेव्हलपमेंट अथॉरीटी) च्या अधिकृत बैठकीसाठी जात होते. सदर बैठक आळीपाळीने लक्षद्वीप आणि अंदमान येथे आयोजित करण्यात येते,” असेही ते म्हणाले.

तर,ऍडमिरल रामदास असेही म्हणाले, “त्यांच्याबरोबर त्यावेळी विदेशी नागरिक नव्हते. मी, कोचीस्थित दक्षिणी नौसेना कमांडचा एक फ्लॅग अधिकारी, कमांडीग प्रमुख, त्यावेळी ‘आयएनएस विराट’ नौकेवर उपस्थित होतो.”

(पीटीआय कडून मिळालेल्या माहितीनुसार)

मूळ इंग्लिश लेख.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0