अजित पवारांच्या पाठींब्यातून मजबूत सरकार देणार : फडणवीस

अजित पवारांच्या पाठींब्यातून मजबूत सरकार देणार : फडणवीस

मुंबई : राज्यात पुन्हा आलेले भाजपच सरकार पाच वर्षे टिकेल व छ. शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आपण घडवणार असल्याचे राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. फडणवीस यांनी ‘मोदी है तो मुमकीन है’ अशीही घोषणा दिली.

शनिवारी सकाळी नाट्यमयरित्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांचा दुपारी भाजपच्या मुंबईतील मुख्यालयात सत्कार करण्यात आला. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, विनोद तावडे, हर्षवर्धन देशमुख व पक्षाचे शेकडो समर्थक उपस्थित होते.

आपल्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या समर्थनातून भाजपचे मजबूत सरकार पाच वर्षे निर्वेधपणे काम करेल. जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला आहे, त्यामुळे जनतेच्या हितासाठी हे सरकार काम करेल असे स्पष्ट करत मोदी है तो मुमकीन है अशी घोषणाही त्यांनी दिली. मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, पक्षाचे हंगामी अध्यक्ष नड्‌डा यांचे आभार फडणवीस यांनी मानले.

COMMENTS