अखेर काबूलचाही पाडाव, अध्यक्ष परागंदा

अखेर काबूलचाही पाडाव, अध्यक्ष परागंदा

काबूल/वॉशिंग्टनः अफगाणिस्तानची राजधानी काबूल अखेर तालिबानच्या हाती लागले आहे. रविवारी तालिबानने काबूल शहराच्या सर्व बाजूंना वेढले. त्यानंतर शहरातील सर

आसाममध्ये पोलिसांचा स्थानिकांवर गोळीबार
कोरोनाचा नवा विषाणू युरोपात पोहोचला
’अ‍ॅप’ले आपण!

काबूल/वॉशिंग्टनः अफगाणिस्तानची राजधानी काबूल अखेर तालिबानच्या हाती लागले आहे. रविवारी तालिबानने काबूल शहराच्या सर्व बाजूंना वेढले. त्यानंतर शहरातील सरकारी कार्यालये ओस पडली व कर्मचारी पळून जाताना दिसत होते.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी व उपाध्यक्ष अमरुल्लाह सलेह यांनी देश सोडल्याचे वृत्त आहे. तालिबानची आगेकूच वाढत चालल्यानंतर घानी यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढत होता. अफगाणिस्तानमधील बहुतांश सर्व मोठी शहरे गेल्या १० दिवसांत तालिबानच्या हातात आल्यानंतर घानी यांच्यापुढे सत्ता सोडण्याशिवाय पर्यायही शिल्लक राहिला नव्हता. घानी तजाकिस्तानात गेल्याची वृत्त अफगाणिस्तानमधील प्रमुख प्रसार माध्यम टोलो न्यूजने दिले आहे. पण या वृत्ताची शहानिशा झालेली नाही. तर माजी अध्यक्ष करझाई यांनी आपण काबूलमध्येच असल्याचे एका व्हीडिओद्वारे अफगाण जनतेला सांगितले.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी

दरम्यान, काबूल सहजासहजी तालिबानच्या हाती लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेली २० वर्षे अफगाणिस्तानच्या लष्करावर अमेरिका, ब्रिटनने अब्जावधी डॉलर खर्च केले होते. पण प्रत्यक्षात कोणताही विरोध न होता तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तान काही दिवसांत ताब्यात घेतला आहे.

दरम्यान अफगाणिस्तानातील सत्तेतील परिवर्तन शांततेत होईल असे आश्वासन तालिबानने दिले आहे. आम्हाला कोणताही हिंसाचार नको आहे, सत्ता परिवर्तन शांततेत होणे देशाच्या हिताचे असल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. आमच्या सैनिकांना हिंसाचार करू नका असे आदेश वरिष्ठ नेत्यांकडून आले आहेत. आम्ही अफगाणिस्तानच्या जनतेचे सेवक आहोत. जनतेची संपत्ती, महिला-मुलांची सुरक्षितता आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. जनतेमध्ये घबराट पसरावी अशी आमची इच्छा नाही. पण शांतता राखण्याची जबाबदारी अफगाण सरकारवर असल्याचेही तालिबानने स्पष्ट केले.

या दरम्यान अमेरिकेने आपल्या दूतावासातील कर्मचार्यांना मायदेशी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काबूलमधील अमेरिकी दुतावासावर अमेरिकी लष्करी हेलिकॉप्टर उतरताना दिसत होते. आपल्या सर्व कर्मचार्यांची निर्धोक सुटका व्हावी, कोणताही हिंसाचार होऊ नये, म्हणून अमेरिका व तालिबानमध्ये वाटाघाटी सुरू आहेत.

या दुतावासातील अफगाणिस्तानासंदर्भातील अत्यंत संवेदनशील अशी कागदपत्रे नष्ट करण्यासही अमेरिकेने आपल्या कर्मचार्यांना सांगितले आहे. या माहितीचा दुरुपयोग होऊ नये, असे कारण सांगितले जात आहे.

अमेरिका आपला दूतावासही मोकळा करणार आहे. या दुतावासात आता कोणताही अमेरिकी नागरिक, सरकारचा कर्मचारी उपस्थित नसणार आहे. मात्र अमेरिकेचे काही अधिकारी काबूल विमानतळावर काही काळ थांबणार आहेत. ते परिस्थितीवर नजर ठेवून असणार आहे.

१२९ भारतीय परत आले

तालिबानच्या हाती काबूल आल्यानंतर भारताच्या १२९ नागरिकांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने रात्री ८ वाजता नवी दिल्लीत आणण्यात आले. हे नागरिक तालिबानच्या हल्ल्यामुळे अफगाणिस्तानात अडकून पडले होते. यांना घेऊन येणारी ३ विमाने उड्डाणे रद्द झाली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0