नवी दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीमध्ये आणि पावसात गेली ४१ दिवस सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महिला शक्ती संपूर्णपणे उतरली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व गुरुवारी हरियाणातील महिलांनी स्वतः ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हातात घेऊन केले. त्यामुळे हे आंदोलन भविष्यात कोणते वळण घेणार याची झलक पाहावयास मिळाली.
नवी दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीमध्ये आणि पावसात गेली ४१ दिवस सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महिला शक्ती संपूर्णपणे उतरली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व गुरुवारी हरियाणातील महिलांनी स्वतः ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हातात घेऊन केले. त्यामुळे हे आंदोलन भविष्यात कोणते वळण घेणार याची झलक पाहावयास मिळाली.
गेले काही दिवस पंजाब आणि हरयाणा तसेच उत्तर प्रदेशमधील शेतकरी आंदोलनात सहभागी झाला असल्याने घरातील महिला शेती करत आहे. आता याच महिला आंदोलनात सक्रिय झाल्या आहेत.
२६ जानेवारीला होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीची सुरुवात गुरुवारी करण्यात आली आणि त्याची झलक दाखविण्यात आली. यावेळी हरियाणातील महिलानी ट्रॅक्टरचे स्टिअरिंग आपल्या हातात घेतले. या आंदोलनामुळे हरियाणातील महिला सध्या आंदोलनाच्या वातावरणात सहभागी होण्यास तयार होताना दिसत आहेत. घरात चूल आणि मूल सांभाळत बसलेल्या स्त्रियांनी ट्रॅक्टरच्या स्टिअरिंगवर बसलेली ट्रॅक्टर रॅली सुरू केल्याने संपूर्ण वातावरण आता आंदोलनमय झाले आहे. पंजाब, हरयाणामधील गावेच्या गावे आता या आंदोलनात उतरत आहेत.
हरियाणातील स्त्रियांच्या इतिहासातील हा एक नवा अध्याय आहे. अनेक चुकीच्या रूढी-परंपरा बदलायला कित्येक वर्षे लागतात! आणि हरियाणा आपल्या देशाच्या राजधानीच्या क्षेत्रात आला असला तरी सामाजिक परिवर्तनाचा वेग अजूनही अविचारी आहे. आणि त्यातही दलित आणि स्त्रियांची परिस्थिती खूप वाईट आहे. आजची ही बदलाची नांदी आणि मोठ्या आशेचा किरण मानला जात आहे. हळुवार होत असलेले सामाजिक परिवर्तन असूनही हे पाऊल एकाच परिवर्तनाचे पुढचे पाऊल आहे.
त्याचप्रमाणे हरियाणासारख्या राज्यातून या हरियाणा महिला क्रांतीची नवी सुरुवात असल्याचे मानले जाते. ही अबला आता नारी शक्तीच्या रूपातून घराबाहेर पडली आहे. हरयाणा आणि पंजाबच्या इतिहासात अशी घटना पहिल्या वेळी घडल्याचे अनेकांनी सांगितले. या महिला बाहेर पडल्या आहेत ते सुद्धा कडाक्याच्या थंडीत आणि मुसळधार पावसात.
दरम्यान आंदोलन स्थळी कडाक्याची थंडी, पाऊस आणि पाणी टंचाई निर्माण झाली असली तरी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची आणि किमान आधार किंमत (एमएसपी) कायदेशीर हमी भाव मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर उभे राहिले आहेत.
हाडे गोठवणाऱ्या हिवाळ्यात विविध राज्यांतील शेतकरी आंदोलक हे सुमारे ४१ दिवस दिल्लीच्या सीमेवर आहेत. यातील बहुतांश शेतकरी पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील आहेत. त्यात पाऊस पडल्याने दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (डीएसजीएमसी) शहराच्या सिंघू सीमेवरील शेतकऱ्यांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी तंबूत तात्पुरते उंच पलंग उपलब्ध करून दिले आहेत.
अतुल माने हे मुक्त पत्रकार आहेत.
COMMENTS