ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन: बकिंगहॅम पॅलेस

ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन: बकिंगहॅम पॅलेस

बकिंगहॅम पॅलेसने एका निवेदनात म्हटले आहे, "आज दुपारी बालमोरल येथे राणीचे शांततेत निधन झाले,"

बालमोरल (स्कॉटलंड): ब्रिटनमध्ये सर्वाधिक काळ राज्य करणारी राणी आणि सात दशके राष्ट्राची प्रमुख म्हणून भूमिका असलेल्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले, असे बकिंगहॅम पॅलेसने गुरुवारी सांगितले.

बकिंगहॅम पॅलेसने एका निवेदनात म्हटले आहे, की आज दुपारी बालमोरल येथे राणीचे शांततेत निधन झाले.

आता राणीचा मोठा मुलगा चार्ल्स (७३) आपोआप युनायटेड किंगडमचा राजा आणि ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंडसह इतर १४ राज्यांचा प्रमुख बनणार आहे.

डॉक्टरांनी राणीच्या प्रकृतीबद्दल कालच चिंता व्यक्त केल्यानंतर राणीचे कुटुंबीय तिच्या स्कॉटलंड येथील घरी, बालमोरल कॅसल येथे आले होते. बकिंगहॅम पॅलेसने सांगितले होते, की राणीला गेल्या वर्षाच्या अखेरीस ‘एपिसोडिक मोबिलिटी प्रॉब्लेम्स’ हा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे राणीने सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे बंद केले होते.

राणी एलिझाबेथ दुसरी, ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात जास्त काळ सेवा देणारी राष्ट्रप्रमुख होती, ६ फेब्रुवारी १९५२ रोजी तिचे वडील किंग जॉर्ज सहावे यांच्या निधनानंतर, ती फक्त २५ वर्षांची असताना सिंहासनावर आली. पुढच्या वर्षी जूनमध्ये तिचा राज्याभिषेक झाला.

राणीच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिले की, “राणी एलिझाबेथ द्वितीय आपल्या काळातील एक दिग्गज नेत्या म्हणून स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिले. त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा आणि सभ्यता यांचे कायम पालन केले. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या  कुटुंबियांसोबत आणि यूकेच्या लोकांसोबत आहेत.”

COMMENTS