शेतकऱ्याच्या मृत्यूचे वृत्तः द वायरच्या वार्ताहरावर गुन्हा दाखल

शेतकऱ्याच्या मृत्यूचे वृत्तः द वायरच्या वार्ताहरावर गुन्हा दाखल

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनादिवशी ट्रॅक्टर रॅलीमध्ये एका शेतकर्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त ट्विट केल्यामुळे द वायरचे संस्थापक व संपादक सिद्धार्थ वरदराज

‘मॉडर्ना’च्या लसीचे परिणाम आशादायक
अखेर व्हीसा मंजूर; ७४ वर्षानंतर दोन भावांची भेट
मतदान करण्यापूर्वी टोनी जोसेफ यांचे ‘अरली इंडियन्स’ वाचा

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनादिवशी ट्रॅक्टर रॅलीमध्ये एका शेतकर्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त ट्विट केल्यामुळे द वायरचे संस्थापक व संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्यावर फिर्याद दाखल केल्यानंतर उ. प्रदेश पोलिसांनी चौकशीसाठी द वायरच्या वार्ताहर इस्मत अरा यांचेही नाव फिर्यादीत समाविष्ट केले आहे. रामपूर जिल्ह्यातील सिविल लाइन्स पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गेल्या ३० जानेवारी रोजी इस्मत अरा यांचे एक वृत्त द वायरने प्रसिद्ध केले होते. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडच्या दिवशी नवन्रीत सिंग यांचे ट्रॅक्टर पलटून झालेल्या दुर्घटनेत निधन झाले होते. पण दुर्घटनेची माहिती लगेच न कळवताच नवन्रीत सिंग यांच्यावर पोस्टमार्टम करताना आम्हाला कळवण्यात आले असा कुटुंबियांचा आरोप होता. या पोस्टमार्टम अहवालात नवन्रीत सिंग यांचे निधन डोक्याला इजा झाल्याने झाले असे नमूद करण्यात आले होते. द वायरने हे वृत्त देताना पोलिस व डॉक्टरांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती. तसेच त्यांनी नवन्रीत सिंग यांच्या कुटुंबाकडून झालेले आरोप फेटाळून लावले होते ते नमूद केले होते.

या प्रकरणातील पहिली फिर्याद रामपूर जिल्ह्यातील रहिवासी संजू तुराहा यांनी दाखल केली होती. तर इस्मत अरा यांच्याविरोधातील तक्रार रामपूर जिल्ह्यातील एक रहिवासी साकिब हुसेन यांनी दाखल केली.

या प्रकरणाच्या चौकशीत हे वृत्त द वायरने प्रसिद्ध केले होते व ते द वायरच्या वार्ताहर इस्मत अरा यांनी दिले होते अशी माहिती मिळाल्याचे रामपूरचे एएसपी संसार सिंग यांनी सांगितले. तर उ. प्रदेश पोलिसांनी दिलेल्या प्रेस रिलिजमध्ये इस्मत अरा यांच्याविरोधात तक्रार साकिब हुसेन यांनी दिल्याचे नमूद करण्यात आले होते. अशीच तक्रार पूर्वी सिद्धार्थ वरदराजन यांच्याविरोधात दाखल केल्यानंतर याच प्रकरणात इस्मत अरा यांचे नाव समाविष्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघांवर आयपीसीतील १५३ ब, ५०५(२) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इस्मत अरा यांचे वृत्त व वरदराजन यांचे ट्विट यामुळे रामपूरमधील सामान्य माणसामध्ये संताप निर्माण झाला असून त्याने तणाव वाढल्याची तक्रार करण्यात आली आहे असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. रामपूरचे जिल्हाधिकारी यांनीही वरदराजन यांच्या ट्विटला उत्तर देताना तुम्ही दिलेल्या वृत्तामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे तुम्हाला समजेल असे म्हटले होते.

वरदराजन यांनी वृत्त ट्विट करताना नव्रनीत सिंग यांचे आजोबा हरदीप सिंग डिबडिबा यांचे वक्तव्य अधोरेखित केले होते. डिबडिबा यांनी आपल्या नातवाचा मृत्यू पोलिसांच्या गोळीमुळे लागल्याने झाल्याचा आरोप केला होता. पण दिल्ली पोलिसांनी नवन्रीत सिंग यांचा मृत्यू ट्रॅक्टर पलटून झाल्याचा दावा केला होता. दिल्ली पोलिसांनी आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ सीसीटीव्ही फुटेजही प्रसिद्ध केले होते. यात ट्रॅक्टर पोलिसांच्या बॅरिकेडला धडकल्याचे दिसत होते.

नवन्रीत सिंग यांच्या पोस्टमार्टम अहवालात गोळी लागली नाही, असे नमूद केले होते. पण नवन्रीत यांच्या कुटुंबियांनी सरकारच्या दबावामुळे गोळी लागल्याचे पोस्टमार्टम अहवालात नमूद करण्यात आले नाही, असा आरोप करत डॉक्टरांनी नवन्रीतचा मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचे आम्हाला सांगितले होते, असा दावा केला होता.

द वायरने हे वृत्त देताना पोलिस व डॉक्टरांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती. डॉक्टरांनी नवन्रीत सिंग यांच्या कुटुंबाकडून झालेले आरोप फेटाळून लावले होते व द वायरने तसे वृत्त दिले होते.

द वायरकडे रामपूरचे सीएमओ मनोज शुक्ला व वार्ताहर इस्मर अरा यांच्या दरम्यान झालेले दूरध्वनी संभाषणही मुद्रीत केलेले आहे. यात डॉक्टरांनी नवन्रीत सिंग यांच्या कुटुंबियांचे सर्व आरोप फेटाळले आहे. आम्ही नवन्रीत यांच्यावर पोस्टमार्टम तातडीने केले व त्याची प्रत एएसपी व एसएचओला पाठवून दिली होती, असे सांगितले.

नंतर नवन्रीत सिंग यांच्या शरीरावर गोळी लागली होती का असा प्रश्न शुक्ला यांना विचारला असता त्यांनी ते नाकारले नाही पण याचे उत्तर डॉक्टरच देऊ शकतील असे स्पष्ट केले.

द वायरने या वृत्तात बरेलीचे अतिरिक्त पोलिस उपमहानिरीक्षक अविनाश चंद्रा यांची अधिकृत प्रतिक्रिया समाविष्ट करण्यात आली होती. चंद्रा यांनी नवन्रीत सिंग यांच्या पोस्टमार्टम अहवालाची चौकशी करण्यासाठी एक समितीही नेमली होती. व त्यांच्या मृत्यूचे कारण लपवण्याचा कोणाचाही प्रयत्न नव्हता असेही स्पष्ट केले होते. शनिवारी रामपूर जिल्हा दंडाधिकार्यांनी वस्तूस्थिती धरून वृत्त द्यावे अशी विनंती करणारे ट्विट वरदाजन यांना उद्देशून केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0