हवामान बदल रोखण्याचे लक्ष्य यंदाही चुकणार?

हवामान बदल रोखण्याचे लक्ष्य यंदाही चुकणार?

झ्युरिच : जागतिक कोविड साथीमुळे हवामान बदलाच्या वेगावर काहीही परिणाम झालेला नाही,  कार्बन उत्सर्जनात घट करण्याच्या संघर्षात जग पिछाडीवरच आहे, असे संयु

जगभर पुराचे थैमान : ग्लोबल वार्मिंगचे तडाखे
हवामान बदलाने भारतात उष्णतेची लाट
नव्या जीवनशैलीसाठी तयार राहा

झ्युरिच : जागतिक कोविड साथीमुळे हवामान बदलाच्या वेगावर काहीही परिणाम झालेला नाही,  कार्बन उत्सर्जनात घट करण्याच्या संघर्षात जग पिछाडीवरच आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी गुरुवारी जाहीर केले.

कोविड साथीमुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे गेल्या वर्षी कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनात तात्पुरती घट दिसून आली होती. मात्र, ग्रीनहाउस वायूंचा वाढता स्तर कमी करण्यासाठी ती पुरेशी नव्हती, असे वर्ल्ड मेटरोलॉजिकल ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएमओ) म्हटले आहे.

कार्बन उत्सर्जन घटवण्याची उद्दिष्टे पूर्ण होत नाही आहेत जागतिक तापमानवाढ १.५ अंशांनी कमी करण्याचे पॅरिस करारातील उद्दिष्ट जग गाठू शकणार नाही, असे डब्ल्यूएमओने आपल्या युनायटेड इन सायन्स ट्वेंटीट्वेंटीवन अहवालात नमूद केले आहे.

“हवामानविषयक कृतींच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे आहे. आपण उद्दिष्टापासून किती दूर आहोत हे या अहवालातून चिंताजनकरित्या दिसून आले आहे,” असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनिओ ग्युतेरेस म्हणाले.

“या वर्षी जीवाष्म इंधनांच्या ज्वलनातून होणारे उत्सर्जन पुन्हा वाढले, ग्रीनहाउस वायूंच्या केंद्रीकरणाचा स्तर वाढतच आहे आणि हवामानविषयक तीव्र स्वरूपाच्या घडामोडी झाल्या. यामुळे प्रत्येक खंडातील मानवी आरोग्य, आयुष्य व उपजीविकेच्या साधनांवर परिणाम झाला आहे,” असेही ते म्हणाले. वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड, मिथेन व नायट्रस ऑक्साइड या वायूंचे केंद्रीकरण २०२० व २०२१ सालाच्या पहिल्या सहामाहीत वाढतच आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी नमूद केेले आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी जागतिक तापमान सर्वाधिक म्हणजे औद्योगिकीकरणपूर्व काळाच्या तुलनेत १.०६ अंश ते १.२६ अंश सेल्सिअसने अधिक होते. पुढील पाच वर्षांत ते औद्योगिकीकरणपूर्व काळाच्या तुलनेत किमान १.५ अंश सेल्सिअस अधिक राहील अशी ४० टक्के शक्यता आहे.

“ग्रीनहाउस वायू उत्सर्जन तातडीने, जलद व मोठ्या प्रमाणावर कमी झाले नाही, तर जागतिक उष्मावाढीला १.५ अंशांची मर्यादा घालणे अशक्य होईल आणि याचे प्रलंयकारी परिणाम अवघ्या पृथ्वीला भोगावे लागतील,” असे ग्युतेरेस म्हणाले.

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0