वुहानला मुंबईने मागे टाकले

वुहानला मुंबईने मागे टाकले

मुंबई: चीनच्या ज्या वुहान शहरातून करोनाचा सर्वप्रथम उद्रेक झाला, त्या वुहानलाही मुंबईने करोना रुग्णांच्या संख्येत मागे टाकले आहे. वुहानमधील करोनाबाधित

वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक
श्रीलंकाः आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेने
‘ओपन’ व्यापार आणि मानवी प्रगती

मुंबई: चीनच्या ज्या वुहान शहरातून करोनाचा सर्वप्रथम उद्रेक झाला, त्या वुहानलाही मुंबईने करोना रुग्णांच्या संख्येत मागे टाकले आहे. वुहानमधील करोनाबाधितांची संख्या ५० हजार ३४० असून त्या तुलनेत मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ५० हजार ८७८ झाली आहे. त्यामुळे करोनाच्या साथीचं केंद्र असलेल्या वुहान शहरापेक्षाही मुंबईतील करोना रुग्णांची संख्या अधिक झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. मुंबईत आज १ हजार १५ नवे करोना रुग्ण सापडल्याने करोना रुग्णांची संख्या ५० हजार ८७८ झाली आहे. तर आज ९०४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या २२ हजार ९४२ झाली आहे. आज मुंबईत ५८ रुग्ण दगावल्याने मुंबईतील करोनाने दगावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ७५८ झाली आहे. आज दगावलेल्यांपैकी ४७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. आज दगावलेल्या ५८ रुग्णांपैकी ४० रुग्ण पुरुष तर १८ महिला होत्या. मृतांपैकी दोघे ४० वर्षाचे होते. तर ३० जण ६० वर्षांवरील होते. इतर २६ जण ४० ते ६० वर्ष वयोगटातील होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0