‘याहू’ची भारतातील वृत्त व क्रिकेट सेवा बंद

‘याहू’ची भारतातील वृत्त व क्रिकेट सेवा बंद

नवी दिल्लीः तंत्रज्ञान क्षेत्रातील एकेकाळची बलाढ्य कंपनी असलेल्या याहूने भारतातील आपली माहिती सेवा देणे बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांना यापुढे याहूक

ओबीसी आरक्षण : राज्य सरकार अध्यादेश काढणार
आर्थिक विकासदर उणे राहील – रिझर्व्ह बँक
न्यायालयानेच राज्यपालांचे कान उपटले

नवी दिल्लीः तंत्रज्ञान क्षेत्रातील एकेकाळची बलाढ्य कंपनी असलेल्या याहूने भारतातील आपली माहिती सेवा देणे बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांना यापुढे याहूकडून दिल्या जाणार्या बातम्या व क्रिकेटसंबंधित माहिती मिळणार नाही.

डिजिटल मीडियामध्ये परदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर सरकारने अनेक निर्बंध आणणारे कायदे केले आहेत. त्या मुळे याहू न्यूज व याहू क्रिकेट या सेवा आम्हाला देता येणे शक्य नाही असे या कंपनीने आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. या सेवा बंद करण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते पण हा दुःखद निर्णय घ्यावा लागला असे याहूचे म्हणणे आहे.

याहू न्यूज व याहू क्रिकेट या सेवा बंद झाल्या असल्या तरी याहू मेल ही सेवा कार्यरत राहणार आहे. भारतासोबत अनेक दशकांचे आमचे संबंध आहेत, ते चालू राहावेत अशी आमची इच्छा असल्याचेही याहूच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी हफपोस्टनेही गाशा गुंडाळला होता

गेल्या नोव्हेंबरमध्ये अमेरिका स्थित डिजिटल मीडिया कंपनी ‘हफपोस्ट’ची भारतातील डिजिटल प्रकाशन ‘हफपोस्ट इंडिया’चे काम बंद केले होते. गेली सहा वर्षे हे डिजिटल प्रकाशन काम करत होते. मोदी सरकारने देशातील डिजिटल मीडिया कंपन्यांमध्ये परदेशी आर्थिक मदतीवर अंकुश आणल्याने त्याचा थेट परिणाम ‘हफपोस्ट इंडिया’वर झाला होता.

डिजिटल मीडियात परदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्के इतकी ठेवण्यात आली आहे. या पूर्वी अशी मर्यादा नव्हती. पण नव्या धोरणांमुळे भारतात काम करणे शक्य नसल्याचे ‘हफपोस्ट इंडिया’ कंपनीच्या सूत्रांनी ‘द वायर’ला सांगितले होते.

‘हफपोस्ट इंडिया’मध्ये १२ पत्रकार काम करत होते.

अमेरिकेतील संपर्क क्षेत्रातील बलाढ्य मानल्या जाणार्या ‘व्हेरिजॉन’ने ‘हफपोस्ट’ कंपनी अन्य एक कंपनी ‘बझफीड’ला विकली होती. पण भारत व ब्राझीलमध्ये हा करार झाला नव्हता.

‘हफपोस्ट इंडिया’ बंद करण्याचा निर्णय ‘बझफीड’चे संस्थापक व सीईओ जोनाह परेटी यांनी जाहीर करताना भारतातील परदेशी गुंतवणुकीच्या नियमांकडे बोट दाखवले होते. परदेशी कंपन्यांना त्यांच्या वृत्तांवर नियंत्रण मानवत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

सुमारे सहा कोटी रु.च्या भांडवलावर ‘हफपोस्ट इंडिया’ २०१५मध्ये सुरू झाले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0