शैक्षणिक योग्यता वाढण्याबरोबरच बेरोजगारीतही वाढ

शैक्षणिक योग्यता वाढण्याबरोबरच बेरोजगारीतही वाढ

नवी दिल्ली : देशात शैक्षणिक योग्यता वाढण्याबरोबरच बेरोजगारीही वाढत असल्याचा एक अहवाल अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ सस्टेनेबल एम्प्लॉयमेंटने प्रस

एनएसएसच्या सर्वेक्षणातून दिसत आहे शेतकऱ्यांची स्थिती
हिंदी चित्रपटातील दृश्याचा फोटो झुबैरच्या अटकेचे कारण
‘ब्लाइंडनेस’ – आपली कृतिशून्यता जाणवून देणारी रुपककथा

नवी दिल्ली : देशात शैक्षणिक योग्यता वाढण्याबरोबरच बेरोजगारीही वाढत असल्याचा एक अहवाल अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ सस्टेनेबल एम्प्लॉयमेंटने प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल १५ ते २९ वयोगटातील तरुणांना केंद्रस्थानी धरून करण्यात आला आहे. त्यानुसार २००४-२००५ या वर्षी देशातील बेरोजगार तरुणांची संख्या ८९ लाख होती ती २०११-२०१२मध्ये ९० लाख तर २०१७-२०१८मध्ये २ कोटी ५० लाख इतकी वाढली आहे.

या अहवालात २०११-१२ ते २०१७-१८ या काळात ९० लाखाहून अधिक रोजगार कमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या वाढत्या बेरोजगारीच्या संख्येत शैक्षणिक योग्यता असूनही तरुणांना रोजगार मिळत नसल्याचे चित्र दिसून आले आहे.

या अहवालानुसार खालील राज्यांत बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. उ. प्रदेश (३० लाख), आंध्र प्रदेश (२२ लाख), तमिळनाडू (२२ लाख), महाराष्ट्र (१९लाख), बिहार (१९ लाख), प. बंगाल (१५लाख), म. प्रदेश (१३लाख), कर्नाटक (१२लाख), राजस्थान(१२ लाख), ओदिशा (११लाख), गुजरात (१० लाख) व केरळ (१० लाख) इतकी आहे.

हा अहवाल जेएनयूतील प्राध्यापक संतोष मेहरोत्रा व सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाबचे प्राध्यापक जेके परिदा यांनी केला आहे.

मेहरोत्रा व परिदा यांचा हा अभ्यास राष्ट्रीय नमुना चाचणीच्या आकडेवारीबरोबरच २०१७-१८मधील ‘पिरियॉडिक लेबर फोर्स’च्या आकडेवारीवरही आधारित आहे.

या दोघांच्या मते शेती क्षेत्रात रोजगार वेगाने कमी होत असून २०११-१२मध्ये शेतीमध्ये २३.२ कोटी रोजगार होते. हा आकडा २०१७-१८मध्ये २०.५ कोटी इतका खाली आला आहे.

२०११-१२मध्ये सेवा क्षेत्रात १२.७ कोटी रोजगार होता तो २०१७-१८मध्ये १४.४ की इतका वाढला असून खाणउद्योगसारख्या क्षेत्रातील रोजगार ५.५ कोटीवरून ५.९ कोटी इतका वाढला तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधील रोजगार २०११-१२मध्ये सहा कोटी होता तो २०१७-२०१८मध्ये ५.६ कोटी इतका खाली आला आहे.

शेती व्यतिरिक्त अन्य क्षेत्रातील रोजगारांमध्ये कमी वाढ होत असल्याने शिक्षित तरुणांमध्ये निराशा पसरली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे २०११-१२मध्ये १५ ते २९ वयोगटात ८.३ कोटी बेरोजगार होते. ही संख्या २०१७-१८मध्ये १० कोटीहून अधिक झाली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1