प्रियंका गांधी यांचा फोन हॅक – काँग्रेसचा आरोप

प्रियंका गांधी यांचा फोन हॅक – काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा फोन हॅक करून त्यांच्यावरही व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचा आरोप रविवारी काँग्रेसने केला.

जेटलींची राजीव गांधीना क्लीन चीट !
राज्य बँक घोटाळा : अजित पवारांसह बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल
उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा फोन हॅक करून त्यांच्यावरही व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचा आरोप रविवारी काँग्रेसने केला. व्हॉट्सअपने भारतातल्या पत्रकार, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, नेत्यांना जेव्हा त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे मेसेज पाठवले होते. त्या सुमारास त्यांनी प्रियंका गांधी यांना मेसेज करून त्यांच्यावर पाळत ठेवल्याची माहिती दिली होती, असा दावा पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. पण व्हॉट्सअपने प्रियंका गांधी यांना केव्हा मेसेज पाठवला याची माहिती काँग्रेसने दिलेली नाही.

रविवारच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसने भाजपचे नाव ‘भारतीय जासूसी पार्टी’ असे असल्याची टीका करत व्हॉट्सअपद्वारे केलेल्या हेरगिरीत मोदी सरकारचाच हात असल्याचा आरोप केला. इस्रायलने हेरगिरीसाठी तयार केलेले पिगॅसस सॉफ्टवेअर हे सरकारशिवाय अन्य कुणालाही विकता येत नाही, आणि हे सॉफ्टवेअर २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पत्रकार, नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात आले, यात केंद्र सरकारचाच हात असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला. पिगॅससद्वारे कोणते इंटरनेट, ब्रॉडबँड नेटवर्क करप्ट केले याची माहिती काँग्रेसला आहे. ही हेरगिरी सर्वोच्च न्यायालयापासून खासदार व राज्य सरकारांवर केली होती. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये पिगॅसस सॉफ्टवेअर आढळून आले, असाही दावा  सूरजेवाला यांनी केला.

१२१ भारतीयांवर पाळत

भारतातील १२१ व्हॉट्सअप वापरत असलेल्या खातेदारांची माहिती गेल्या सप्टेंबर महिन्यात व्हॉट्सअप कंपनीने केंद्र सरकारला दिली होती. पण माहिती-तंत्रज्ञान खात्याने ही माहिती अपुरी व मोठ्या प्रमाणावर तांत्रिक स्वरुपाची असल्याचे कारण सांगत त्यावर उपाययोजना केली नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. या पूर्वी मे महिन्यातही व्हॉट्सअपने केंद्र सरकारला याबाबत माहिती दिल्याचे व्हॉट्सअपच्या सूत्रांनी सांगितले.  त्यावेळीही काही हालचाल झाली नव्हती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0