भाजपच्या अहंकाराला झारखंडचे उत्तर – शरद पवार

भाजपच्या अहंकाराला झारखंडचे उत्तर – शरद पवार

झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीचा विजय हा भाजपच्या अहंकाराला झारखंडच्या जनतेने दिलेले उत्तर असल्याचे राष्ट्रवादी काँ

भाजपाविरोधाचा सारीपाट….
भाजपचा राष्ट्रवाद पोकळ आणि घातकहीः मनमोहन सिंग
कमलनाथ सरकारची आज परीक्षा

झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीचा विजय हा भाजपच्या अहंकाराला झारखंडच्या जनतेने दिलेले उत्तर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले असून, त्यांनी झारखंडच्या जनतेचे अभिनंदन केले.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले. ते म्हणाले, “सध्या देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, लोक एकत्र येऊन हा प्रयत्न हाणून पाडत आहेत. निवडणुकीत आपण कसेही जिंकू येऊ, असा अहंकार भाजपने दाखवला. मात्र, झारखंडच्या जनतेने त्याला योग्य पद्धतीने उत्तर दिले आहे.”

पवार पुढे म्हणाले, की राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर होते. निवडणुकीनंतर या राज्यात बदल झाला असून, भाजप सत्तेतून पायउतार झाला आहे. देशात होत असलेल्या बदलाच्या प्रवाहात झारखंडही सहभागी झाले आहे. झारखंडमधील परिस्थिती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. या राज्यात आदिवासी आणि गरिबांची संख्या मोठी आहे. त्याही परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली सत्तेची ताकद व आर्थिक ताकद न जुमानता झारखंडच्या जनतेने आपला कौल दिला आहे. त्यामुळे या जनतेचे आभार मानत असल्याचे पवार म्हणाले.

झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच पवार यांनी प्रतिक्रिया दिली. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपला रघुवर दास यांच्या नेतृत्त्वाखाली मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व मित्रपक्षाच्या आघाडीची सत्ता झारखंडमध्ये येणार आहे.

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आर्थिक मंदी आली आहे. त्यामुळेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्र सरकारला देशातील परिस्थिती हाताळण्यास अपयश आले आहे. महाराष्ट्राने भाजपविरोधात एकजूट दाखवत मार्ग दाखवला. झारखंडनेही तोच मार्ग पकडून भाजपविरोधात एकजूट दाखवली. त्यामुळे येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने देशातील इतर राज्यातही बदल पाहण्यास मिळेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यातील एक उमेदवार विजयी झाल्याची माहितीही पवार यांनी दिली.

फडणवीस यांची पवारांवर टीका

एल्गार परिषदेप्रकरणी सोयीची भूमिका शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याने घेणे योग्य नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘शरद पवार यांनी एल्गार प्रकरणी केलेल्या वक्तव्याचे आश्चर्य वाटले. ज्यांना अटक झाली त्यांची पार्श्वभूमी काय आहे, सुधीर ढवळे, अरुण परेरा, वरणोन गोंसल्व्हीस याना राष्ट्रवादीचे गृहमंत्री असताना अटक करण्यात आली होती. मनमोहन सिंग सरकारने या बंदी घातलेल्या संघटनांची नावे संसदेत सांगितली होती. तेव्हा ते योग्य होते, मग आमच्या सरकारच्या काळात कारवाई झाल्यास लगेचच जातीयवादी कसे? सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना जामीन नाकारला आहे. केवळ कोरेगाव भीमाच नव्हे, तर अन्य अनेक प्रकरणात अटक आरोपींचा हात असल्याचे पुरावे आहेत. सोयीची भूमिका पवारांसारख्या मोठ्या नेत्याने घेणे योग्य नाही, त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचेल. पवारांचा पक्ष सत्तेत असताना यादीत अर्बन नक्षल हा शब्द आला आहे. डॉ. आंबेडकरांनी माओवादाचा विरोध केला होता. पवारांची दिशाभूल केली जात आहे.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0