गेहलोत सरकारने बहुमत सिद्ध करावेः भाजप

गेहलोत सरकारने बहुमत सिद्ध करावेः भाजप

जयपूरः राजस्थानमध्ये गहलोत सरकारवर आलेल्या पक्षांतर्गत राजकीय संकटात भाजपने आता उडी मारली असून सरकारने लवकरच आपले बहुमत विधानसभेत सिद्ध करून दाखवावे अ

पवारांचे घर राजकीय चर्चांचे केंद्र
मोदीसे ज्यादा जेटली ‘गरम’
पहलू खान हत्याप्रकरणातील सर्व ६ आरोपी निर्दोष

जयपूरः राजस्थानमध्ये गहलोत सरकारवर आलेल्या पक्षांतर्गत राजकीय संकटात भाजपने आता उडी मारली असून सरकारने लवकरच आपले बहुमत विधानसभेत सिद्ध करून दाखवावे अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते गुलाब चंद कटारिया यांनी केली आहे.

गहलोत सरकारने आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याअगोदर विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, असे सांगत कटारिया यांनी या राजकीय पेचप्रसंगावर पक्ष बुधवारी पक्ष बैठक घेणार असल्याचे सांगितले.

गहलोत यांचा पायलट यांच्यावर निशाणा

मंगळवारी उपमुख्यमंत्रीपद व प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर सचिन पायलट यांच्यावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निशाणा साधत पायलट यांच्या हातात आता काही उरलेले नाही ते भाजपच्या हातातले बाहुले बनल्याचा आरोप केला आहे.

गेहलोत यांनी मंगळवारी राज्यातील पेचप्रसंगाची माहिती राज्यपाल कलराज मिश्रा यांना दिली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गेहलोत यांनी म. प्रदेशात भाजपने जशी काँग्रेसची सत्ता उलथवली तसा हा प्रकार राजस्थानात सुरू असून गेली सहा महिने भाजप सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. सचिन पायलट यांना, त्यांच्या सहकार्यांना, मंत्र्यांना, आमदारांना प्रत्येक वेळी संधी दिली गेली पण यातील एकही जण सोमवारी व मंगळवारी पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहिला नसल्याकडे गेहलोत यांनी लक्ष वेधले. पक्षाने तीन मंत्र्यांना हटवण्याचा निर्णय कोणताही पर्याय नसल्याने घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयाने कोणीही आनंदी नाही. ना पक्षाचे अध्यक्ष, ना आमदार ना कार्यकर्ते तरीही कोणताच पर्याय नसताना असा निर्णय घ्यावा लागला. आम्ही कोणीही पायलट यांच्याविरोधात पक्षप्रमुखांकडे तक्रार केली नव्हती असेही गेहलोत यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने मंत्रिपदावरून हटवलेले एक आमदार विश्वेंदर सिंह यांनी आम्ही पक्षाच्या विरोधात कोणतेही विधान केले नसल्याचा दावा केला आहे. आम्ही पक्षाच्या हायकमांडचे लक्ष जाहीरनाम्यात नमूद केलेल्या मुद्द्यांकडे वेधण्याचा प्रयत्न करत होतो. सत्तेत येऊन दोन वर्षे पुरी झाली तरी वचननामा पुरा झालेला नाही. आमच्या कोणत्या चुकीसाठी ही शिक्षा देण्यात आली आहे, असा सवालही त्यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0