पुजाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर झोमॅटोने जाहिरात हटवली

पुजाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर झोमॅटोने जाहिरात हटवली

नवी दिल्लीः मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनी झोमॅटो या खाद्यपदार्थ वितरणाच्या अँपच्या जाहिरातीवर आक्षेप घेतल्यानंतर झोमॅ

हंटर बायडनचा वाचनीय खुलासा
सातव्या वेतन आयोगातील दरापेक्षा किमान वेतन खूपच कमी
यंदाही मोदी सरकारकडून आंबेडकर पुरस्कारांची घोषणा नाही

नवी दिल्लीः मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनी झोमॅटो या खाद्यपदार्थ वितरणाच्या अँपच्या जाहिरातीवर आक्षेप घेतल्यानंतर झोमॅटोने आपली जाहिरात मागे घेतली आहे. झोमॅटोच्या जाहिरातीत महाकाल रेस्तराँ येथून थाळीची मागणी करण्याचा एक प्रसंग आहे. या जाहिरातीत प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन याने काम केले आहे. तो एका प्रसंगात, ‘थाली (Food Platter) का मन किया, उज्जैन में हैं, तो ‘महाकाल’ से मंगा लिया.’ असे म्हणतो. यावर पुजारी भडकले आहेत.

या जाहिरातीतील महाकाल थाळीचा उल्लेख उज्जैन येथील महाकाल मंदिर ट्रस्टला खटकला. या ट्रस्टच्या अध्यक्षांनी ही जाहिराती हिंदूंच्या भावनांची चेष्टा असून ही जाहिरात रद्द न केल्यास कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. यावरून ट्विटरवर ट्रेंडही सुरू झाले होते. अनेक नेटिझननी हृतिकला लक्ष्य करण्यास सुरूवात केली.

उज्जैनचे जिल्हाधिकाऱ्यांनी महाकाल मंदिरात मोफत प्रसाद दिला जातो, तो विकला जात नाही, असे स्पष्ट करत ही जाहिरात लोकांमध्ये संभ्रम पसरवत असल्याचेही पत्रकारांना सांगितले.

अखेर झोमॅटो कंपनीने महाकाल रेस्तराँची जाहिरात मागे घेत असल्याचे जाहीर करत या जाहिरातीच्या माध्यमातून कोणाच्याही श्रद्धांचा, भावनांचा अनादर करण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे माफी मागत असल्याचे स्पष्टीकरण दिले. आमच्या जाहिरातीत महाकाल थाळीचा उल्लेख असून त्याचा उज्जैन येथील भगवान महाकालेश्वर मंदिराशी काही संबंध नाही. महाकाल रेस्तराँमधून सर्वाधिक खाद्यपदार्थ मागवले जातात व त्या हॉटेलमधील महाकाल थाळी ही सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे तिचा उल्लेख जाहिरातीत केला गेला आहे, असे झोमॅटोचे म्हणणे आहे. भारतातील प्रत्येक शहरातले लोकप्रिय रेस्तराँ व त्या रेस्तराँतील उत्तम खाद्यपदार्थ यांच्या शोधात आम्ही आहोत, त्याचाच एक भाग म्हणून ही जाहिरात केली असल्याचा खुलासा झोमॅटोने केला आहे.

म. प्रदेशच्या गृहमंत्र्यांचे आदेश

दरम्यान महाकाल थाळीवरून वादात म. प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हेही उतरले आहेत. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावे असे आदेश पोलिसांना दिले आहेत. सोशल मीडियात महाकाल थाळीचा व्हीडिओ पाहिला, त्यात काही छेडछाड केली गेली आहे हे पोलिसांनी तपासून त्याचा अहवाल मला द्यावा असे निर्देश मिश्रा यांनी दिले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0