नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी असून मंगळवारी सुनावणीच्या आठव्या दिवशी रामलल्ला विराजमानच्या वकिलांनी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी असून मंगळवारी सुनावणीच्या आठव्या दिवशी रामलल्ला विराजमानच्या वकिलांनी मशीद बांधण्यासाठी रामाचे मंदिर पाडल्याचा दावा केला. हा दावा करताना रामलल्ला विराजमानच्या वकिलांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या एका अहवालाचा आधार दिला.
रामलल्ला विराजमानचे वकील सीएस वैद्यनाथन यांनी भारतीय पुरातत्व खात्याच्या अहवालात रामजन्मभूमी-बाबरी मशीद परिसरातल्या जमिनीमध्ये प्राचीन मंदिरांचे अवशेष मिळाले असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या अवशेषांमध्ये मगरी व कासवांची प्रतिकांचाही उल्लेख आहे. इस्लामी संस्कृतीत ही प्रतिके वापरली जात नसल्याने व अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुरातत्व खात्याचा अहवाल मान्य केला असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. वैद्यनाथन यांनी बाबरी मशीद पाडली त्यावेळी पांचजन्यमध्ये आलेल्या एका लेखाचाही हवाला दिला.
मूळ लेख
COMMENTS