‘आवश्यक सर्व झाडे कापली’

‘आवश्यक सर्व झाडे कापली’

अन्य ठिकाणची झाडे तोडण्यास सुप्रीम कोर्टाची स्थगिती

#aareyAiKaNa – आरे आयका ना!
#SaveAareyforest संतप्त झाला सोशल मीडिया
मुंबईत मधोमध विस्तीर्ण जंगलाचा निर्णय

नवी दिल्ली : मुंबईतील आरे कॉलनीतल्या प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी यापुढे झाडे तोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पण सरकारच्या बाजूने युक्तीवाद करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मेट्रो कारशेडसाठी जेवढी वृक्षतोड आवश्यक होती तितकी करण्यात आली असे सांगून आरे वृक्षतोडीबाबत जो पर्यंत स्पष्ट निर्णय होत नाही तोपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. या प्रकरणाची सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे.

आरे कॉलनीतील किती झाडे कापण्यात आली याचा आकडा अजून निश्चित झालेला नव्हता. शुक्रवारी रात्री एक हजारहून अधिक झाडे कापल्याचे सांगण्यात येत होते. पण न्यायालयातच राज्य सरकारने आवश्यक तेवढी झाडे कापल्याचे सांगितल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आरे बचाव कार्यकर्ते व सरकारच्या वृक्षतोडीच्या निर्णयावर संतप्त झालेल्या सामान्य नागरिकांच्या हाती काहीच मिळालेले नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0