२ हजारच्या नकली नोटांच्या संख्येत १०७ टक्क्याने वाढ

२ हजारच्या नकली नोटांच्या संख्येत १०७ टक्क्याने वाढ

नवी दिल्लीः चलनात असलेल्या बनावट नोटा, दहशतवाद्यांना होणारी आर्थिक मदत, काळ्या पैशावर टाच व भ्रष्टाचार नष्ट होणार अशा घोषणा करत २०१६मध्ये पंतप्रधान नर

नाशिक मराठी साहित्य संमेलन ३, ४ व ५ डिसेंबरला
एनआरसीवरून सर्व पक्ष असमाधानी
‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद

नवी दिल्लीः चलनात असलेल्या बनावट नोटा, दहशतवाद्यांना होणारी आर्थिक मदत, काळ्या पैशावर टाच व भ्रष्टाचार नष्ट होणार अशा घोषणा करत २०१६मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली होती. पण नोटबंदी करूनही २००० रु.च्या नकली नोटांचे प्रमाण चलनात अधिक असल्याची कबुली केंद्र सरकारने लोकसभेत दिली. नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना मोदींनी चलनातील १००० रु.ची नोट रद्द करून २ हजार रु.ची नवी नोट चलनात आणली होती. पण २०१६ ते २०२० या दरम्यान २ हजार रु.च्या नकली नोटा चलनात असण्याचे प्रमाण १०७ टक्क्याने वाढल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत सोमवारी दिली.

चौधरी म्हणाले, २०१६ मध्ये २ हजार रु.च्या २,२७२ नकली नोटा जप्त करण्यात आल्या. त्यानंतर २०१७मध्ये ७४,८९८, २०१८मध्ये ५४,७७६, २०१९मध्ये ९०,५६६ व २०२०मध्ये २ लाख ४४ हजार ८३४ नोटा जप्त केल्या गेल्या.

२०१८ साल वगळता २०१६ नंतर २ हजार रु.च्या नकली नोटांचा सुळसुळाट अधिक वाढल्याचे या आकडेवारी दिसून येते. २०१९ ते २०२० या काळात १०७ टक्क्याने नकली नोटांचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येते.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0