इराणींच्या कंपनीचा पत्ता, जीएसटी क्रमांक वादग्रस्त गोवा रेस्टॉरंटचाच

इराणींच्या कंपनीचा पत्ता, जीएसटी क्रमांक वादग्रस्त गोवा रेस्टॉरंटचाच

नरेंद्र मोदी सरकारमधील महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी, त्या स्वत: किंवा त्यांची मुलगी, गोव्यातील सिली सोल्स कॅफे अँड बार चालवत नाही, असे

डिजिटल मीडियावर अंकुश ठेवण्याच्या योजनेत पत्रकारही सामील
आझाद यांच्या राजीनाम्याचा भाजपला किती फायदा?
रंग रंग रंगीला रे…

नरेंद्र मोदी सरकारमधील महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी, त्या स्वत: किंवा त्यांची मुलगी, गोव्यातील सिली सोल्स कॅफे अँड बार चालवत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले, तेव्हाचे त्यांचे सत्यकथन जरा हातचे राखूनच होते. एका मृत व्यक्तीच्या नावाने मद्यविक्रीच्या परवान्यासाठी अर्ज कसा केला हे स्पष्ट करण्यासाठी या वादग्रस्त रेस्टोरंटला राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

या प्रकरणाशी संबंंधित कोणतेही तथ्य, दस्तावेज किंवा नोंद आपण लपवलेली नाही असे इराणी यांनी शपथेवर सांगितले खरे, पण त्यांनी काही बाबी लपवल्या हे स्पष्ट आहे. या बाबी पुढीलप्रमाणे:

१. इराणी यांचे पती व कुटुंबाद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या एटॉल फूड अँड बेव्हरेज या कंपनीचा पत्ता (घरक्रमांक ४५२, बौटो वाड्डो असागोआ) हाच या वादग्रस्त बार व रेस्टोरंटचा पत्ता आहे.

२. इराणी कुटुंबाच्या कंपनीला दिलेली जीएसटी क्रमांकच सिली सोल्स कॅफे अँड बारचा जीएसटी क्रमांक आहे, हे ‘द वायर’ने सिद्ध केले आहे.

३. मागील आर्थिक वर्षासाठी इराणी कुटुंबाच्या कंपनीने दाखल केलेले ताळेबंद व नफा/तोटा पत्रक ‘द वायर’ने प्राप्त केले आहे आणि यामध्ये मागील वर्षात मद्याची खरेदी, विक्री केल्याच्या नोंदी यात आहेत. याचा अर्थ एटॉल फूड अँड बेव्हरेजेच्या व्यवसायात मद्यविक्रीचा समावेश आहे व यासाठी कायद्याने परवाना असणे आवश्यक आहे. ‘रेस्टोरंट्स चालवणे’ हे कंपनीच्या उद्दिष्टांपैकी एक म्हणून

झुबीन इराणीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील प्रोफाइलचा स्क्रीनशॉट.

झुबीन इराणीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील प्रोफाइलचा स्क्रीनशॉट.

नमूद करण्यात आले आहे.

एवढेच नाही तर, झुबिन इराणी यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील तपशिलांमध्ये ‘को-फाउंडर @सिलीसोल्सकॅफे गोवा’ असे नमूद आहे आणि हे अकाउंट स्मृती इराणी फॉलो करत आहेत. इराणी यांची १८ वर्षीय मुलगी झोईश इराणीने फूड क्रिटिक कुणाल विजयकर यांना दिलेल्या मुलाखतीत सिली सोल्स तिचे आहे का, असे विचारले गेले असता, होकारार्थी उत्तर दिले आहे.

सिली सोल्स कॅफे अँड बार हा एटॉलच्या मालकीचा तरी आहे किंवा तो याच कंपनीद्वारे चालवला तरी जात आहे हे यावरून स्पष्ट आहे. उग्रया मर्केंटाइल  व उग्रया अॅग्रो या कुटुंबाच्या मालकीच्या दोन कंपन्यांमार्फत इराणी यांच्या मुलाचाही यात ७५ टक्के वाटा आहे.

झोइश या रेस्टोरंटमध्ये फक्त ‘इंटर्नशिप’ करत होती असा दावा इराणी यांचे वकील कीरतसिंग नागरा यांनी केला असला, तरी इराणी कुटुंबाने रेस्टोरंटच्या मालकीविषयीक कोणतीही टिप्पणी केलेली नाही. ‘रेस्टोरंटच्या मालकीशी संबंधित सर्व दस्तावेज व माहिती; तसेच अर्ज केलेला व मंजूर झालेला परवाना हे सर्व सार्वजनिक क्षेत्रात आहे’ एवढेच इराणी यांनी उच्च न्यायालयात दाखल याचिकेत म्हटले आहे.

नोंदी काय दाखवतात?

कंपनी रजिस्ट्रारकडील नोंदींनुसार, ईएफएबीचे मालक गीता वजानी, हर्ष खनेजा व कनिका सेठ हे आहेत. झुबिन इराणी या कंपनीशी कोणत्या प्रकारे जोडलेले आहेत, ईएफएबीच्या कामाचे स्वरूप काय आहे याविषयी ‘द वायर’ने या तिघांनाही प्रश्नावली पाठवली आहे पण त्यांच्याकडून उत्तर आलेले नाही. गेल्याच आठवड्यात स्मृती इराणी यांनाही ईमेल व ट्विटरद्वारे प्रश्न पाठवण्यात आले होते पण त्यांचीही दखल घेण्यात आलेली नाही. या सर्वांकडून उत्तरे आल्यानंतर हा वृत्तांत अद्ययावत केला जाईल.

मृताच्या नावे मद्याचा परवाना

एटॉल फूड अँड बेव्हरेज या कंपनीची मालकी - स्रोत: आरओसी फाइलिंग

एटॉल फूड अँड बेव्हरेज या कंपनीची मालकी – स्रोत: आरओसी फाइलिंग

वकील व कार्यकर्ते एरीज रॉड्रिग्ज यांनी माहिती अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीच्या आधारे २१ जुलै रोजी ‘हेराल्ड गोवा’ने एक वृत्तांत प्रसिद्ध केला. सिली सोल्स बार अँड कॅफेच्या उत्पादनशुल्क परवान्याचे बेकायदा पद्धतीने नूतनीकरण झाल्याचा आरोप यात होता. या रेस्टोरंटचा संबंध स्मृती इराणी यांच्या कुटुंबाशी असल्याचा उल्लेख वेबसाइटने केला होता पण अधिक तपशील दिलेले नव्हते. वर्षभरापूर्वी निधन झालेल्या अँथनी डीगामा यांच्या नावे सहा महिन्यांपूर्वी मद्यपरवाना जारी झाल्याचा उल्लेख यात होता. रॉड्रिग्ज यांच्या तक्रारीवरून गोव्याच्या उत्पादनशुल्क आयुक्तांनी रेस्टोरंटला कारणे दाखवा नोटीस बजावली आणि काँग्रेसने या मुद्दयावरून इराणी यांच्यावर हल्ला चढवला.

इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले पण पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. पवन खेरा, जयराम रमेश या काँग्रेस नेत्यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप करत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तथ्यांची पडताळणी न करता इराणी यांच्यावर बेछूट आरोप झाल्याचे न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ना यांनी ग्राह्य धरले. काँग्रेस नेत्यांनी अवमानकारक सोशल मीडिया पोस्ट्स २४ तासांत डिलिट कराव्यात असेही न्यायालयाने सांगितले.

स्मृती इराणी यांच्या पतीच्या कुटुंबाच्या कंपन्या व संबंधित रेस्टोरंट यांच्यात विविध स्तरांवर किती दुवे आहेत याची माहिती मिळाली असती, तर न्यायालयाने इराणी यांची याचिका कशी हाताळली असती, हे स्पष्ट नाही.

सिली सॉल्स कॅफे आणि बारद्वारे फाइल केलेल्या जीएसटी (GST) प्रमाणपत्राची प्रत. स्रोत: विशेष व्यवस्था.

सिली सॉल्स कॅफे आणि बारद्वारे फाइल केलेल्या जीएसटी (GST) प्रमाणपत्राची प्रत. स्रोत: विशेष व्यवस्था.

एटॉल एलएलपीची कहाणी

एटॉल फूड अँड बेव्हरेजेस एलएलपी ही एक मर्यादित उत्तरदायित्व कंपनी असून, ११ डिसेंबर २०२० रोजी ती मुंबईत नोंदवण्यात आली.

गीता वजानी, हर्ष खानेजा व कनिका सेठ हे डेझिग्नेटेड पार्टनर्स होते, तर राहुल वोहरा व मंगेश गंगाराम जोशी हे बॉडी कॉर्पोरेट डीटी नॉमिनी होते.  १८ जानेवारी, २०२१ रोजी कंपनीने गोव्यात जीएसटी नोंदणी केली आणि घरक्रमांक ४५२, बौटो वाड्डो असागोवा, गोवा या पत्त्यावरून काम करण्यासाठी कंपनीला 30AAIFE7039H1ZM हा जीएसटी क्रमांक देण्यात आला. सिली सोल्स कॅफेच्या फेसबूक पेजवरील संपर्कामध्ये info@eight-all.com हा ईमेल अॅड्रेस आहे, हा आणखी एक दुवा. सिली सोल्सची मालकी आपल्याकडे असल्याचा दावा डीगामा कुटुंबाने उत्पादनशुल्क विभागाकडे केला आहे. आपण यापूर्वी येथेच होम स्टे चालवत होतो असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, १.५ कोटी रुपयांहून अधिक उलाढालीच्या करदात्यांच्या गोवा सरकारने तयार केलेल्या या यादीत डीगामा व त्यांच्या होम स्टेचा उल्लेख नाही. सिली सोल्सचा जीएसटी क्रमांक  30AAIFE7039H1ZM आहे, असे रेस्टोरंट अॅग्रीगेटर प्लॅटफॉर्मद्वारे स्पष्ट झाले आहे. ईएफएबीचाही हाच जीएसटी क्रमांक आहे.

उग्रया मर्केंटाइल बोर्डाचा ठराव.

उग्रया मर्केंटाइल बोर्डाचा ठराव.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातील संचालकांच्या मास्टर डेटानुसार, झुबीन फेरदून इराणी हे उग्रया अॅग्रो फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड व उग्रया मर्केंटाइल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहे. स्मृती इराणी यांच्या विवरणपत्रातही हे नमूद आहे. कंपन्यांचे ६७ टक्के समभाग झुबीन यांच्याकडे, तर ३३ टक्के समभाग त्यांच्या तीन अपत्यांमध्ये समप्रमाणात वाटलेले आहेत, असे स्मृती यांनी २०२१ मध्ये फाइल केलेल्या विवरणपत्रात म्हटले आहे. ५ नोव्हेंबर २०२० रोजी या कंपन्यांनी ठराव मंजूर करून एटॉल फूड अँड बेव्हरेजेस एलएलपीचे समावेशन करून घेतले. यावर झुबीन इराणी यांची स्वाक्षरी आहे.

एटॉल फूड अँड बेव्हरेज या कंपनीच्या  ‘31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षाच्या आर्थिक विवरणातील  नोट्स’ मद्य आणि अन्न पदार्थ खरेदी दर्शवतात.

एटॉल फूड अँड बेव्हरेज या कंपनीच्या ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षाच्या आर्थिक विवरणातील नोट्स’ मद्य आणि अन्न पदार्थ खरेदी दर्शवतात.

एटॉल फूड अँड बेव्हरेज या कंपनीच्या  ‘31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षाच्या आर्थिक विवरणातील  नोट्स’ मद्य आणि अन्न पदार्थ खरेदी दर्शवतात.

एटॉल फूड अँड बेव्हरेज या कंपनीच्या ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षाच्या आर्थिक विवरणातील नोट्स’ मद्य आणि अन्न पदार्थ खरेदी दर्शवतात.

एटॉल फूड अँड बेव्हरेज या कंपनीच्या 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षाच्या आर्थिक स्टेटमेन्टच्या नोट्समध्ये स्वयंपाकघरातील उपकरणे, रेफ्रिजरेटर्स आणि इतर गोष्टींबरोबरच 'फूड ट्रक स्ट्रक्चर'चा समावेश आहे.

एटॉल फूड अँड बेव्हरेज या कंपनीच्या ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षाच्या आर्थिक स्टेटमेन्टच्या नोट्समध्ये स्वयंपाकघरातील उपकरणे, रेफ्रिजरेटर्स आणि इतर गोष्टींबरोबरच ‘फूड ट्रक स्ट्रक्चर’चा समावेश आहे.

थोडक्यात, उग्रया अॅग्रो फार्म्स व उग्रया मर्केंटाइल या दोन कंपन्यांने मालक म्हणून झुबीन व त्यांच्या तीन मुलांचे एटॉल फूड अँड बेव्हरेजेस एलएलपीमध्ये ७५ टक्के समभाग आहेत. ही कंपनी रेस्टोरंट्स चालवले असे त्यांच्या फायलिंग्जवरून दिसते, कंपनीचा पत्ता व सिली सोल्स रेस्टोरंटचा पत्ता एकच आहे, दोहोंचा जीएसटी क्रमांकही एकच आहे. दोन उग्रया कंपन्यांकडे एटॉलचे ७५ टक्के समभाग असल्याचे ताळेबंदातही नमूद आहे आणि ‘द वायर’ने हे ताळेबंद तपासले आहेत. हर्ष खनेजा व कनिका सेठ यांच्याकडे प्रत्येकी १० टक्के समभाग आहेत, तर उर्वरित ५ टक्के गीता योगेश वजानी यांच्याकडे आहेत. १ जून, २०२१ रोजी कनिका सेठ कंपनीतून बाहेर पडल्या व ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी हर्ष खनेजा यांनीही एटॉलचा राजीनामा दिला. एटॉलचाच अधिकृत पत्ता दाखवणाऱ्या तारोनिश हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणखी एका कंपनीने ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी ठराव संमत करून एटॉलमधील २० टक्के वाटा उचलला. मंगेश गंगाराम जोशी व योगेश कांतिलाल वजानी तारोनिशचे संचालक होते. मंगेश जोशी यांनी योगेश वजानी यांना डीपी नॉमिनी म्हणून मान्यता देऊन ठरावावर स्वाक्षरी केली. योगेश वजानी चार्टर्ड अकाउंटंट असून, त्यांच्याच कार्यालयात दोन्ही कंपन्यांची नोंदणी झाली आहे.

ज्यांच्या आरटीआय अर्जामुळे हे प्रकरण बाहेर आले, ते वकील एरीज रॉड्रिग्ज यांनी ‘द वायर’ला दिलेल्या माहितीनुसार, सिली सोल्स गोवा बार अँड कॅफेला मंजूर झालेल्या परवान्याबाबत उत्पादनशुल्क विभागात २९ जुलैला झालेल्या सुनावणीदरम्यान, डीगामा कुटुंबाच्या वकिलाने सांगितले की, हे रेस्टोरंट ज्या जागेत चालते त्या जागेचा मालक हा बारचा कायदेशीर मालक आहे, एटॉल नव्हे. मात्र, एटॉलने केलेल्या नफा-तोटा फायलिंगमधील चित्र वेगळेच आहे. कंपनीने मद्याच्या व अन्य साहित्याच्या खरेदीसाठी १३ लाख रुपये खर्च केल्याचा उल्लेख यात आहे. जर एटॉल केवळ रेस्टोरंटची मालक असेल व बारशी तिचा काही संबंध नसेल, तर कंपनीने एवढी मोठी रक्कम मद्यावर कशी खर्च केली? ३१ मार्च, २०२१ रोजी या कंपनीची २.३५ लाखाची मद्याची इन्व्हेंटरी होती व अन्नपदार्थांच्या विक्रीतून १९.६ लाख रुपये उत्पन्न होते, तर मद्याच्या विक्रीतून ३.१२ लाख उत्पन्न होते, असे नफा-तोटा खात्यावरून दिसून येते.

जर दिवंगत अँथनी डीगामा यांचे पुत्र डीन डीमागा बार परवानाधारक असतील, तर एटॉल हा परवाना व्यवसायासाठी वापरू शकत नाही, हे गोव्यातील संबंधित कायद्यात स्पष्ट नमूद आहे.

‘द वायर’ने डीन डीगामा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनीही मेल्स, मेसेजेस व कॉल्सना उत्तर दिले नाही.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0