इटली-अमृतसर विमानातील १२५ प्रवाशांना कोरोना

इटली-अमृतसर विमानातील १२५ प्रवाशांना कोरोना

नवी दिल्लीः जगभर कोरोना-१९च्या विषाणूने पुन्हा थैमान घातले असताना इटलीतून अमृतसरला येणाऱ्या विमानातील १२५ प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आल

कोरोनाशी लढ्याचा भिलवाडा पॅटर्न
मान्यवरांच्या राज्यसरकारला सूचना
लॉकडाऊनची धुळवड

नवी दिल्लीः जगभर कोरोना-१९च्या विषाणूने पुन्हा थैमान घातले असताना इटलीतून अमृतसरला येणाऱ्या विमानातील १२५ प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. इटलीच्या मिलान शहर ते अमृतसर अशा ‘नॉन शेड्युल्ड चार्टर फ्लाइट’ (वाययू-६६१) विमानातील १७९ प्रवाशांपैकी १२५ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे अमृतसरच्या विमानतळावर तपासणीअंती निदर्शनास आले. या सर्व प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे.

दरम्यान गुरुवारी गेल्या २४ तासात ९०,९२८ कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही नोंद बुधवारच्या तुलनेत ५६.५ टक्क्याने अधिक आहे. तर ३२५ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात कोरोना महासाथीत मरण पावलेल्यांचा आजपर्यतचा एकूण आकडा ४ लाख ८२ हजार ८७६ इतका झाला आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0