वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘पदव्युत्तर’साठी ३० टक्के राखीव जागा

वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘पदव्युत्तर’साठी ३० टक्के राखीव जागा

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवेत असणाऱ्या वैद्यकीय अधिका-यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३० टक्के जागा राखून ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सूचना दिल्या आहेत.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवेतील वैद्यकीय अधिका-यांना राखीव जागा असाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने (मॅग्मो) केली आहे. त्या अनुषंगाने टोपे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आदिवासी, दुर्गम ग्रामीण भागात कार्यरत वैद्यकीय अधिका-यांना प्रोत्साहन देण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये सेवांतर्गत वैद्यकीय अधिका-यांसाठी राखीव जागा असणे आवश्यक आहे, त्यामुळे ग्रामीण भागात विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील, ही बाब टोपे यांनी अधोरेखित केली.

COMMENTS