वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘पदव्युत्तर’साठी ३० टक्के राखीव जागा

वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘पदव्युत्तर’साठी ३० टक्के राखीव जागा

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवेत असणाऱ्या वैद्यकीय अधिका-यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३० टक्के जागा राखून ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य मं

ट्विटरवर फोटो, व्हिडिओ शेअरसाठी परवानगीची गरज
तणाव असूनही चीनचे ८० गुंतवणूक प्रस्ताव सरकारकडून मंजूर
‘अर्थव्यवस्थेतील समस्या दूर करण्याआधी त्यांची माहिती हवी’

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवेत असणाऱ्या वैद्यकीय अधिका-यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३० टक्के जागा राखून ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सूचना दिल्या आहेत.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवेतील वैद्यकीय अधिका-यांना राखीव जागा असाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने (मॅग्मो) केली आहे. त्या अनुषंगाने टोपे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आदिवासी, दुर्गम ग्रामीण भागात कार्यरत वैद्यकीय अधिका-यांना प्रोत्साहन देण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये सेवांतर्गत वैद्यकीय अधिका-यांसाठी राखीव जागा असणे आवश्यक आहे, त्यामुळे ग्रामीण भागात विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील, ही बाब टोपे यांनी अधोरेखित केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0