६५ टक्के कैदी अनु.जाती-जमाती, ओबीसी प्रवर्गातले

६५ टक्के कैदी अनु.जाती-जमाती, ओबीसी प्रवर्गातले

नवी दिल्लीः देशातल्या तुरुंगांमध्ये ४,७८,६०० कैदी असून त्यातील ३,१५,४०९ (६५.९० टक्के) कैदी अनु. जाती, जमाती व अन्य मागास वर्गातील असल्याची माहिती सरका

मंत्रिमंडळात फेरबदल; मात्र चांगल्या प्रशासनाची ग्वाही नाहीच!
शोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली
भारत-चीन सीमाप्रश्न : नवा दृष्टिकोन हवा

नवी दिल्लीः देशातल्या तुरुंगांमध्ये ४,७८,६०० कैदी असून त्यातील ३,१५,४०९ (६५.९० टक्के) कैदी अनु. जाती, जमाती व अन्य मागास वर्गातील असल्याची माहिती सरकारने राज्यसभेत दिली. हे आकडे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)ने ३१ डिसेंबर २०१९ रोजी नोंद केले आहेत, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.

तुरुंगात असलेल्या ६५.९० टक्के आरोपींमधील १,६२,८०० (३४.०१ टक्के) इतर मागासवर्गीय जातीतील, ९९,२७३ (२०.७४ टक्के) अनु. जातीतील, ५३,३३६ (११.१४ टक्के) अनु. जमातीतील आहेत. तर उर्वरित १,२६,३९३ हे अन्य जातीतील आहेत.

देशातल्या तुरुंगांमध्ये असलेल्या ४,७८,६०० कैद्यांमध्ये पुरुषांची संख्या ४,५८,६८७ (९५.८३ टक्के) व महिलांची संख्या १९,९१३ (४.१६ टक्के) आहे.

महिला कैद्यांमधील ६,३९० (३१.९३ टक्के) ओबीसी प्रवर्ग, ४,४६७ (२२.४३ टक्के) अनु.जाती, २,२८१ (११.४५ टक्के) अनु. जमाती व अन्य ५,१७६ (२६.२९ टक्के) जातीतील आहेत.

मध्य प्रदेशात कैद्यांची संख्या सर्वाधिक ४४,६०३ असून बिहारमध्ये ३९,८१४ व उ. प्रदेश व केंद्र शासित प्रदेशातील कैद्यांची एकूण संख्या १,०१,२९७ (एकूण कैद्यांपैकी २१.१६ टक्के) इतकी आहे.

उ. प्रदेशात ओबीसी, एससी व अन्य जातीतील कैद्यांची संख्या अधिक असून म. प्रदेशात अनु. जातीतील कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे.

२०१९मध्ये एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातल्या तुरुंगात दलित, आदिवासी व मुस्लिमांची संख्या अधिक आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0