‘जय श्रीराम’ची घोषणा पाकिस्तानात करायची का ? – शहा

‘जय श्रीराम’ची घोषणा पाकिस्तानात करायची का ? – शहा

कोलकाताः ‘जय श्रीराम’ बंगालमध्ये म्हटले जात नसेल तर ते पाकिस्तानात म्हटले जाणार का, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्र

या आंदोलनाचा अर्थ काय?
‘मुस्कटदाबी करणे हा देशद्रोह कायद्याचा गैरवापर’
‘गोली मारो..’ म्हणणाऱ्या ३ भाजप कार्यकर्त्यांना अटक

कोलकाताः ‘जय श्रीराम’ बंगालमध्ये म्हटले जात नसेल तर ते पाकिस्तानात म्हटले जाणार का, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उद्देशून गुरुवारी केला. अमित शहा यांनी उ. बंगालमधील कूचबिहारमध्ये एक सभा घेतली, या सभेत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.

‘जय श्रीराम’ म्हटले जाऊ नये, असे वातावरण बंगालमध्ये तयार झाले आहे. ‘जय श्रीराम’ म्हणणेच हा गुन्हा झाला आहे. मग ‘जय श्रीराम’ पाकिस्तानात म्हटले जाणार का असा सवाल करत प. बंगालच्या निवडणुका आटोपल्यानंतर ममता बॅनर्जीच ‘जय श्रीराम’ म्हणू लागतील, असे विधान शहा यांनी केले.

ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत मतांसाठी केवळ एकाच समाजाची खुशामत करण्यात आली असाही आरोप शहा यांनी केला.

‘कोविड लसीकरणानंतर देशात सीएए कायदा लागू’

अमित शहा यांनी प. बंगालमधील मातुआ समुदायाला उद्देशून विधान केले. कोविड-१९ची लसीकरण मोहीम संपल्यानंतर देशभर सीएए कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल. या कायद्याचा अल्पसंख्याक समुदायाविरोधात उपयोग करण्यात येणार नाही. मातुआ समुदाय व अन्य शरणार्थींना या कायद्यांतर्गत भारतीय नागरिकत्व देणार आहोत, असे शहा म्हणाले. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

मातुआ हे पूर्वाश्रमीचे पूर्व पाकिस्तानमधील दुर्बल हिंदू असून ते फाळणी व बांगलादेश निर्मितीवेळी भारतात स्थलांतरित झाले होते. त्यातील अनेकांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे, आता सर्वांना सीएए कायद्याचा लाभ देण्यात येईल, असे शहा म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: