नवी दिल्ली : २०१९-२० च्या अर्थसंकल्पात गर्भश्रीमंतांवर कर (सुपर रिच टॅक्स) लावण्याच्या घोषणेमुळे जुलै महिन्याच्या पहिल्या २० दिवसांत ७,७१२ कोटी रु.ची
नवी दिल्ली : २०१९-२० च्या अर्थसंकल्पात गर्भश्रीमंतांवर कर (सुपर रिच टॅक्स) लावण्याच्या घोषणेमुळे जुलै महिन्याच्या पहिल्या २० दिवसांत ७,७१२ कोटी रु.ची परकीय गुंतवणूक शेअर बाजारातून काढून घेण्यात आली आहे.
याबाबत ‘मार्निंगस्टार’मधील ज्येष्ठ विश्लेषक हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘सुपर रिच’ कराच्या घोषणेमुळे शेअर बाजारामध्ये परदेशी गुंतवणूक मागे घेण्यास सुरवात झाली आहे. सरकारने ‘सुपर रिच’ कराबाबत अद्याप आपली भूमिका बदलली नसल्याचाही गुंतवणूकीवर परिणाम झालेला आहे.
केवळ ‘सुपर रिच’ कराच्या घोषणेमुळेच नव्हे तर जीडीपीची संथ वाढ, मान्सूनची अनिश्चितता व आशियाई बँकेने भारताच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावणार असल्याची शक्यता वर्तवल्यानेही त्याचा परिणाम परकीय गुंतवणूकीवर होताना दिसत आहे.
‘ग्रो’ या कंपनीचे सीओओ हरीश जैन यांच्या मते, इक्विटी मार्केटमधून गुंतवणूक मागे घेण्यामागे इराण-अमेरिकेमधील तणाव हाही एक मुद्दा कारणीभूत आहे. त्याचबरोबर भारतातील काही कंपन्यांचे तिमाही निकालही निरुत्साह दर्शवणारे असल्याने त्याचे पडसाद बाजारपेठेवर दिसत आहेत.
मूळ बातमी
COMMENTS