बंगालमध्ये नड्डा यांच्या गाडीवर दगडफेक

बंगालमध्ये नड्डा यांच्या गाडीवर दगडफेक

डायमंड हार्बरः भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या गाडीवर गुरुवारी येथे दगडफेक करण्यात आली. नड्डा हे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात दौर्यावर

‘अर्जुनाच्या बाणात अण्वस्त्रे, तर रामायणात पुष्पक विमान’
४ राज्ये व पुड्डूचेरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर
अमर्त्य सेन विरुद्ध शांतिनिकेतन वाद चिघळला

डायमंड हार्बरः भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या गाडीवर गुरुवारी येथे दगडफेक करण्यात आली. नड्डा हे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात दौर्यावर आले असता त्यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक केली.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्याही मोटारीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत.

नड्डा हे डायमंड हार्बर येथे आले असता, त्यांचा ताफा रोखण्यासाठी व त्यांच्या निदर्शनासाठी तृणमूल काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते. त्यावेळी हा हल्ला या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. घोष यांनी सुमारे २०० लोकांचा जमाव हातात काठ्या घेऊन भाजपच्या कोलकाता येथील कार्यालयावरही चालून आला असा आरोप केला. हा हल्ला होत असताना पोलिसांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही असेही ते म्हणाले.

ममतांचा आरोप

नड्डा यांच्या गाडीवर केलेली दगडफेक हा भाजपने घडवून आणलेला कट असल्याचा आरोप प. बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी केला. भाजपच्या नेत्यांच्या प्रत्येक बंगाल दौर्यात त्यांच्या कार्यकर्तांच्या हातात लाठ्या, काठ्या असतात आणि ते तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करतात असे त्या म्हणाल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत बीएसएफ, सीआरपीएफ, आर्मी, सीआयएसएफचे जवान असतात मग ते कशाला घाबरतात असाही सवाल त्यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0