ममता- राज्यपाल धनखड मतभेद चिघळले; ट्विटरवर ब्लॉक

ममता- राज्यपाल धनखड मतभेद चिघळले; ट्विटरवर ब्लॉक

कोलकाताः प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील मतभेद सोमवारी अधिक उघडपणे दिसून आले. ममता बॅनर्जी यांनी धनखड यांच्या ट

पक्षांतराचे वारे, नेत्यांचे वातकुक्कुट
भाजपची ७५ लाख रोजगार कार्डची घोषणा मागे
स्विमिंग सूट फोटो : प्राध्यापिकेवर ९९ कोटींचा प्रतिमा हननचा दावा

कोलकाताः प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील मतभेद सोमवारी अधिक उघडपणे दिसून आले. ममता बॅनर्जी यांनी धनखड यांच्या ट्विटला वैतागून त्यांना ब्लॉक केले. धनखड गेले कित्येक दिवस प. बंगालच्या राज्यकारभारावर ट्विटच्या माध्यमातून टीका करत आहेत. रविवारी म. गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी धनखड यांनी प. बंगालची पवित्र भूमी रक्ताने माखलेली असून या राज्यात मानवाधिकारांना पायदळी तुडवले जात असलेले आपण सहन करणार नाही, असे ट्विट केले. पुढे ट्विटमध्ये त्यांनी, लोक आता प. बंगालला गॅस चेंबर म्हणत आहेत. बंगालमध्ये शासन व्यवस्था शिल्लक राहिलेली नाही, येथे फक्त शासक असून घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी मी उचलत असल्याचे म्हटले होते.

या ट्विटमुळे व्यथित होत ममता बॅनर्जी यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत राज्यपालांची आपण माफी मागत असून ते राज्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात मत व्यक्त करतात. घटनाबाह्य व अनैतिक मते व्यक्त करतात. ते लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला निर्देश व सल्लेही देतात, अशा गोष्टींमुळे आपण व्यथित होत असून त्यांना ट्विटरवर ब्लॉक करत असल्याचे जाहीर केले.

ममता बॅनर्जी व धनखड यांच्यातील संबंध गेले अनेक महिने तणावाचे आहेत. केंद्रीय सीमा सुरक्षा दलाला आंतरराष्ट्रीय सीमेच्या १५ किमीच्या आत प्रवेशाला परवानगी दिल्याने प. बंगाल सरकार व केंद्रादरम्यान ठिणगी पडली होती. केंद्राच्या या धोरणाविरोधात ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या पोलिसांना सीमा सुरक्षा दलाचे जवान १५ किमीच्या आत घुसखोरी करणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरून धनखड व ममता बॅनर्जी यांच्यात मतभेद वाढत गेले. राज्य सरकारचा हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका असल्याचा आरोप धनखड यांनी केला होता. राज्य सरकारने आपले आदेश त्वरित मागे घ्यावेत व राष्ट्रीय हिताचा मुद्दा समजून घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले होते. धनखड यांनी राज्य सरकारचा निर्णय केंद्रीय गृहखात्याच्या निर्देशाला अनुसरून नाही, त्याचे पालन करावे असाही सल्लाही ममता बॅनर्जी यांना ट्विट करून दिला होता. या ट्विटनंतर दोघांमध्ये मतभेद चिघळले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0