पिगॅसस : ४ पत्रकारांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

पिगॅसस : ४ पत्रकारांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्लीःपिगॅसस हेरगिरी प्रकरणाची माहिती द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका ४ पत्रकारांनी सर्वोच

अरुणाचलमध्ये चीनने गांव वसवले
‘बॅटल ऑफ मदर्स’
स्वयंचलित यंत्रांच्या ताब्यातले आयुष्य

नवी दिल्लीःपिगॅसस हेरगिरी प्रकरणाची माहिती द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका ४ पत्रकारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

प्रंजॉय गुहा ठाकूरता, एसएनएम अब्दी, प्रेम शंकर झा, रुपेश कुमार सिंह व कार्यकर्ते इप्सा शताक्षी यांनी ही याचिका दाखल केली असून फोरेन्सिक चाचणीत पिगॅसस स्पायवेअरचा मोबाइलमध्ये शिरकाव झाल्याचे सिद्ध झाल्याने ही माहिती सरकारने जाहीर करावी असे या याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून व्यक्तीच्या खासगी जीवनात सरकारने प्रवेश केला आहे, ही कृती मूलभूत अधिकारावरचे सरकारकडून आक्रमण आहे असा मुद्दा या याचिकेत आहे.

या अगोदर गेल्या आठवड्यात ज्येष्ठ पत्रकार एन. राम व शशी कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात पिगॅसस प्रकरणाची चौकशी करण्याची याचिका दाखल केली होती.

या याचिकेची सुनावणी ५ ऑगस्टला सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखाली तीन पीठाकडे होणार आहे. एन. राम व शशी कुमार यांनी पिगॅसस हेरगिरी प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अथवा माजी न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे करावी अशी मागणी आहे.

तर अन्य ४ पत्रकारांच्या मते पिगॅसस हेरगिरी प्रकरणात भारत सरकारने अन्य तिसर्या पक्षाची मदत घेऊन फोन हँकिंग केले आहेत, त्याची चौकशी व्हावी असा मुद्दा उपस्थित केला आहे.

केंद्राने इस्रायलकडून पिगॅसस स्पायवेअर घेतले की नाही याचा स्पष्ट खुलासा केलेला नाही, असेही याचिकाकर्त्यांचे मत आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: