फोन उचलल्यावर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे: मुनगंटीवार

फोन उचलल्यावर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे: मुनगंटीवार

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच निर्णयात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत, की राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांनी फोन उचलताना 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे, तसे आदेश लवकरच दिले जातील.

चीनची घुसखोरीः महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरीतच
कामगार संघटनांच्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
बर्ट्रंड रसेलची तत्त्वज्ञानात्मक लेखनशैली

मुंबई: महाराष्ट्राचे नवनियुक्त सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी (१४ ऑगस्ट) सांगितले, की सर्व राज्य सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात फोन उचलल्यावर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे लागेल.

मुनगंटीवार म्हणाले, “आपण स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. आम्ही अमृत महोत्सव (स्वातंत्र्य) साजरा करत आहोत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी फोन उचलल्यावर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे असे मला वाटते. यासंदर्भातील अधिकृत शासन आदेश १८ ऑगस्टपर्यंत येईल, असे ते म्हणाले.

“मला वाटते की राज्याच्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी पुढील वर्षी २६ जानेवारीपर्यंत (फोन उचलताना) ‘वंदे मातरम’ म्हणावे,” असे मुनगंटीवार म्हणाले.

मंत्रिपद मिळाल्यानंतर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा पहिलाच निर्णय आहे.

शिवसेना फोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आले आहेत. नव्या सरकारमध्ये भाजपच्या आमदारांना अनेक महत्त्वाची खाती मिळाली आहेत.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मंत्रिपदाचे वाटप झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच घेतलेल्या या निर्णयावर मुनगंटीवार म्हणाले, ‘वंदे मातरम हे आमचे राष्ट्रगीत आहे. हा नुसता शब्द नसून भारतमातेबद्दलच्या भारतीयांच्या भावनांचे प्रतीक आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी १८७५ मध्ये लिहिलेल्या या गीताने स्वातंत्र्यसैनिकांना ऊर्जा दिली. त्यांनी अनेकांच्या हृदयात देशभक्तीची ठिणगी पेटवली होती.

मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या या ७५ व्या वर्षात आपण ‘हॅलो’ हा परदेशी शब्द वापरणार नसून त्याऐवजी वंदे मातरम वापरणार आहोत.

आपल्या निर्णयाबाबत त्यांनी ट्विटही केले आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, मंत्रिपद मिळाल्यानंतर आज मी सांस्कृतिक कार्य मंत्री या नात्याने प्रत्येक नागरिक आणि सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांना संभाषण सुरू करण्यासाठी ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ वापरण्याचे आवाहन करतो.’

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0