एलआयसीतील २० टक्के हिस्सा परकीय गुंतवणूकदारांना

एलआयसीतील २० टक्के हिस्सा परकीय गुंतवणूकदारांना

नवी दिल्लीः लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी)मधील २० टक्के हिस्सेदारी परकीय कंपन्यांना विकण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यात एलआय

अपघात, पिस्तुल चोरण्याचा प्रयत्न मग एनकाउंटर
अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ल्यात १०० हून अधिक ठार?
सामाजिक एकजूटीचे सनदी सेवेतील मुस्लिम अधिकाऱ्यांचे आवाहन

नवी दिल्लीः लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी)मधील २० टक्के हिस्सेदारी परकीय कंपन्यांना विकण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यात एलआयसीचे आयपीओ विक्रीस येणार असून त्यातून सरकारला ९०० अब्ज रुपये मिळतील असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार एलआयसीतील गुंतवणूकीसंदर्भात निर्णय घेत आहे.

सध्या परकीय गुंतवणुकदारांना खासगी विमा कंपन्यांमध्ये ७४ टक्के व सरकारी मालकीच्या बँकांमध्ये २० टक्के हिस्सेदारी घेण्याची मुभा आहे. पण यात एलआयसीचा समावेश नाही. आता या निर्णयात बदल करण्याची शक्यता सरकारी सूत्रांनी व्यक्त केली.

एलआयसीमध्ये परकीय गुंतवणूक आणण्याच्या निर्णय झाल्यास परकीय पेन्शन फंड, विमा कंपन्या, म्युचवल फंड कंपन्या एलआयसीच्या आयपीओ खरेदीमध्येही सामील होऊ शकतात.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: