कर्नाटकात हिजाबास शाळांकडून विरोध कायम

कर्नाटकात हिजाबास शाळांकडून विरोध कायम

नवी दिल्लीः हिजाब प्रकरणावरून कर्नाटकात बंद ठेवलेल्या शाळा व महाविद्यालयांचे वर्ग सोमवारी सुरू झाले खरे पण काही शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम विद्यार्

कंदहार, हेरातमधील भारतीय दुतावासांवर तालिबानचे हल्ले
पोलंडमध्ये विरोधी पक्षनेत्यावर पिगॅसस हेरगिरी
अफ़गाणिस्तानचा तिढा

नवी दिल्लीः हिजाब प्रकरणावरून कर्नाटकात बंद ठेवलेल्या शाळा व महाविद्यालयांचे वर्ग सोमवारी सुरू झाले खरे पण काही शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम विद्यार्थीनींना बुरखा व हिजाब वर्गाबाहेर काढण्यास सांगितले जात असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियात दिसून आले.

११ वी व १२ वीचे वर्ग सोडून सोमवारी उडुपी, द. कन्नड व बंगळुरूतील शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या होत्या. आता हे वर्ग बुधवारपासून सुरू होणार आहेत. या भागात १४४ कलम लावण्यात आले होते व पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंड्या येथे शाळेत प्रवेश घेणाऱ्या हिजाब घातलेल्या मुस्लिम विद्यार्थीनींना शाळेतील शिक्षक हिजाब काढण्यास सांगत होते. अशा घटनांचे काही व्हीडिओ ट्विटरवर प्रसिद्ध झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने असा एक व्हीडिओ ट्विट केला. या व्हीडिओ पालक आपल्या मुलीला वर्गात प्रवेश देण्याची विनंती शिक्षकांना करत होते. आमच्या मुली वर्गात गेल्यावर हिजाब काढतील असे पालक सांगत होते. पण शिक्षक हिजाब शाळेबाहेरच काढावा अन्यथा त्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार नाही असे सांगत होते. त्यामुळे मुली हिजाब काढून शाळेत गेल्याचे दिसून आले.

पत्रकार असलेल्या इम्रान खान यांनी मंड्या जिल्ह्यातला एक व्हीडिओ ट्विट केला असून हिजाब घालून प्रवेश देऊ नये अशा सक्त सूचना शालेय प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अन्य एक पत्रकार दीपक बोपण्णा यांनी मंड्यातील एका शाळेतले शिक्षक शाळेबाहेर उभे राहून मुस्लिम विद्यार्थींनींना हिजाब काढण्याचा आग्रह धरत होते व हिजाब काढल्यावर शाळेत प्रवेश दिला जात असल्याचे व्हीडिओ ट्विट केला आहे.

पत्रकार निखिला हेन्री यांनी शिमोगा जिल्ह्यातील एक व्हीडिओ ट्विट केला असून या व्हीडिओत काही विद्यार्थींनीनी हिजाब काढण्यास नकार देत कॅम्पस सोडत असल्याचे दिसून येत होते.

दरम्यान सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान हिजाबास बंदी घालण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या पाच मुलींचे वकील देवदत्त कामत यांनी केंद्रीय शाळांमध्ये हिजाबास बंदी घातलेली नसताना ती राज्यातल्या शाळांना कशी लागू होऊ शकते, असा सवाल केला. जर धार्मिक प्रथा, परंपरा पाळल्याने सार्वजनिक हिताला बाधा पोहचत असेल तर घटनेतील कलम २५(१) अन्वये त्याच्यावर नियंत्रण आणता येते असा त्यांनी युक्तिवाद केला. शाळा-कॉलेजच्या गणवेशाचा रंग हिजाबास चालू शकतो, असाही एक मुद्दा मांडण्यात आला.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0