दंगल रोखू शकत नाही – सरन्यायाधीश बोबडे

दंगल रोखू शकत नाही – सरन्यायाधीश बोबडे

नवी दिल्ली : दिल्लीमधली किंवा कुठलीही दंगल आम्ही रोखू शकत नाही, आम्हाला आमच्या मर्यादा आहेत, असे मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सोमवारी व्यक्त केले. द

शाहीन बागेत जय श्रीरामच्या घोषणा
दगडफेक, जाळपोळ व पोलिस बघ्याच्या भूमिकेत
दिल्ली पोलीस इतकी लाज का घालवत आहेत?

नवी दिल्ली : दिल्लीमधली किंवा कुठलीही दंगल आम्ही रोखू शकत नाही, आम्हाला आमच्या मर्यादा आहेत, असे मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सोमवारी व्यक्त केले. दिल्ली दंगलीला कारणीभूत ठरलेल्या अनुराग ठाकूर, परवेश वर्मा, कपिल मिश्रा व अभय वर्मा या चार भाजप नेत्यांवर त्यांनी केलेल्या चिथावणीखोर घोषणा व भाषणांवरून दिल्ली पोलिसांनी अद्याप फिर्याद दाखल केलेली नाही. ही फिर्याद दाखल करावी अशी याचिका दंगल पीडित १० जणांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ती सोमवारी सुनावणीस आली. त्यावर आपले मत व्यक्त करताना सरन्यायाधीशांनी दंगलीला कोण जबाबदार आहेत, या संदर्भात न्यायालय सर्व पक्षांची बाजू ऐकेल पण अशा दंगली रोखण्यास आम्ही समर्थ नाही, आम्ही दंगल झाल्यानंतर त्यामध्ये दखल घेऊ शकतो, असे मत व्यक्त केले.

याचिकाकर्त्यांचे वकील गोन्साल्विस यांनी चार दिवस चाललेल्या दिल्लीत दरदिवशी किमान १० ते १२ जणांचा मृत्यू होत होता आणि अंतिम आकडा ४७ झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यावर सरन्यायाधीश बोबडेंनी लोक मरावेत असे आम्हाला वाटत नाही पण या प्रकारचा दबाव झेलण्यास न्यायालय सक्षम नाही. आम्ही हे रोखू शकत नाही. आमच्यावर किती दबाव असतो हे तुम्हाला लक्षात आले पाहिजे, आम्ही ते सोसू शकत नाही. शांतता प्रस्थापित व्हावी अशी आशा आम्ही व्यक्त करू शकतो पण आमच्या अधिकारांना मर्यादा आहेत. जेव्हा दंगली घडतात तेव्हा न्यायालयने त्याची दखल घेतात, प्रसार माध्यमातून आम्ही बातम्या पाहात असतो, असे सरन्यायाधीश बोबडे म्हणाले.

या संदर्भात पुढील सुनावणी आज होणार आहे.

दरम्यान दिल्ली दंगलीची व आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत व्हावी अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी दाखल केली आहे. या याचिकेत दंगलीत निष्क्रिय राहिलेल्या दिल्ली पोलिसांचीही खातेनिहाय चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0